आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pm Narendra Modi To Address The Nation On Mann Ki Baat Program

पंतप्रधानांची \'मन की बात\': नेताजींच्या 50 हून अधिक नातेवाइकांना भेटणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (रविवार) 'मन की बात' या कार्यक्रमातून देशातील जनतेसोबत संवाद साधला. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे 50 नातेवाईक ऑक्टोबर महिन्यात पीएम निवासस्थानी येत आहेत. त्यांच्या स्वागतासाठी आपण उत्सुक असल्याचे पंतप्रधानांनी यावेळी सांगितले. नेताजींनी जर्मनीत स्वत:चा रेडिओ सुरु केला होता.विज्ञानात मोठी ताकत आहे. विद्यार्थ्यांनी विज्ञानात रुची वाढवावी, असे आवाहन पंतप्रधानांनी केले.

पंतप्रधान मोदींनी यावेळी अनेक मुद्द्यांना हात घातला. युवक हे देशाचे भविष आहे. युवकांनी मतदार यादीत नाव नोंदवावे. न विसरता मतदान करावा, असे आवाहन देखील मोदींनी यावेळी केले.

मन की बातमधून खूप काही शिकायला ‍मिळाले. ‘मन की बात’साठी लोकांकडून फोनवरुन सूचना मागवल्या आहेत. तापर्यंत एकूण 55 हजार फोन आल्याचे मोदींनी सांगितले.लोकशाहीत मोठी ताकद आहे. देशातील एखादा चिमुरडा देखील मला सूचना करू शकतो, असे मोदींनी यावेळी सांगितले.

देशातील जवळपास 30 लाख लोकांना गॅस सबसिडी नाकारली आहे. देशातील खादी उत्पदानांची विक्री दुप्पट झाली आणि हे कोणत्याही विज्ञानामुळे शक्य झालेले नाही तर हा देशातील जनतेने दाखवलेला विश्वास आहे.

'#SelfieWithDaughter' हॅशटॅगची मुलींबाबत आदर वाढण्यास मदत झाली. दिवाळीत मातीपासून तयार केलेल्या दिव्यांचा वापर करावा, असे आवाहन पंतप्रधान मोदींनी केले आहे.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी यांनी नेताजी यांच्याशी संबंधित फाइल्स सार्वजनिक केल्या. नेताजी यांच्याशी संबंधित इतर फाइल्ससंदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 11 वेळा 'मन की बात' या कार्यक्रमातून 235 मिनिटे देशातील जनतेशी संवाद साधला आहे. 25 भाषांमध्ये मन की बात हा कार्यक्रम रेडिओ व टीव्ही वरून टेलिकास्ट करण्‍यात येतो. या कार्यक्रमावर आतापर्यंत 90 लाख रुपये खर्च झाला आहे.