आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींच्या हस्ते आज तीन योजनांचे लोकार्पण, देशभरात उपस्थित राहातील मंत्री

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी तीन कल्याणकारी योजनांचे लोकार्पण करणार आहेत. त्यातील एक आहे पेंशन योजना तर, इतर दोन विमा योजना आहेत. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि अटल पेन्शन योजना या तीन योजनांचे लोकार्पण मोदी पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे करणार आहेत. तर, देशातील इतर भागांमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्री या योजना लॉन्च करणार आहेत. अर्थ मंत्रालयाकडून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकानूसार विविध राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये 122 केंद्रांवर राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्यपाल व केंद्रीय मंत्री उपस्थित राहातील.
महाराष्ट्रात या योजनांचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई विद्यापीठाच्या पदवीदान सभागृहात होणार आहे. या वेळी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, शालेय शिक्षण, क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री विनोद तावडे, उद्योग मंत्री सुभाष देसाई, भारतीय आयुर्विमा महामंडळाचे अध्यक्ष एस. के. रॉय, बँक ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक एस. मुहनोत उपस्थित राहतील.
कोण कुठे उपस्थित असणार
गृह मंत्री राजनाथ सिंह- लखनऊ
अर्थ मंत्री अरुण जेटली- मुंबई
परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज- भोपाळ
संसदीय कार्य मंत्री व्यंकय्या नायडू- वाराणसी
अन्न धान्य पूरवठा मंत्री रामविलास पासवान- पाटणा
परिवहन मंत्री नितिन गडकरी- भागलपुर
पुढील स्लाइडमध्ये जाणून घ्या योजनेविषयी