आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pm Narendra Modi To Offer Chadar At Ajmer Sharif

ओबामानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी चढवणार अजमेर शरीफ येथे चादर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सुफी संत हजरत ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांच्या 803 व्या उरुसाला सुरुवात होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी अजमेर शरीफ दर्ग्यावर चादर चढवणार आहेत. पंतप्रधान मोदींतर्फे केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी चादर घेऊन जाणार आहेत. विशेष म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी शनिवारीच अजमेर शरीफ येथे चादर चढवली होती. ओबामांच्या वतीने अमेरिकेचे राजदूत रिचर्ड वर्मा यांनी अजमेरला भेट दिली होती. ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांना भारतीय उपखंडातील सर्वात मोठे सुफी संत म्हणून ओळखले जाते. येत्या रविवारपासून अजमेर शरीफ येथील उरुसाला सुरुवात होणार आहे.
गेल्या महिन्यात झाला होता वाद
गेल्या महिन्यात एक मुस्लिम शिष्टमंडळ पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी आले होते. यासंदर्भात पीएमओकडून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या निवदेनात म्हटले होते, की अजमेर शरीफचे उत्तराधिकारी देखील सहभागी होते. हा दावा अमजेमर दर्ग्याचे दीवान जैनुल अब्दीन अली खान यांनी फेटाळला होता. खान यांच्या म्हणण्यानुसार ते ख्वाजाचे सजदानशीं (उत्तराधिकारी ) आहेत. दर्ग्याच्या वतीने सांगण्यात आले होते, की दीवान जैनुल अब्दीन अली खान त्या दिवशी अजमेर शरीफ येथेच होते. जी व्यक्ती त्यांना ख्वाजाचे सजदानशीं म्हणून भेटली त्यांनी पंतप्रधानांना धोका दिला आहे. यापेक्षाही पंतप्रधानांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोणातून ही गंभीर बाब आहे.
पीएमओकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात अजमेर शरीफचे सजदानशी सैय्यद सुल्तान उल हसन चिश्ती मिसबाह हे देखील पंतप्रधानांच्या भेटीसाठी आलेल्या मुस्लिम शिष्टमंडळासोबत असल्याचे म्हटले होते.