आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • PM Narendra Modi To Visit White House On Sept 29 30: US Office

अमेरिकन भारतीय मंडळी पंतप्रधान नरेंद्र मोदींना ऐकण्यास उत्सुक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - अमेरिकेच्या न्यूयॉर्कस्थित मेडिसन स्क्वेअर गार्डनमध्ये २८ सप्टेंबर रोजी होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रॅलीसाठी तेथील भारतीयांमध्ये मोठा उत्साह आहे. रॅलीसाठी स्थळ निश्चित करण्यात आले तेव्हाच मोदींनी लाल िकल्ल्यावर दिलेल्या भाषणातून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची चर्चा सुरू होती.
रॅलीचे आयोजन करणाऱ्या इंडियन अमेरिकन कम्युनिटी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. चंद्रकांत पटले यांनी सांगितले की, लाल कल्ल्यावरील मोदींचे भाषण लाखोंच्या संख्येने अमेरिकेत डाऊनलोड करण्यात आले आहे. तीस हजारांपेक्षा अधिक लोकांनी पाससाठी नोंदणी केली आहे. जेव्हा की, रॅली असलेल्या ठिकाणी केवळ २० हजार लोकांच्या बसण्याची व्यवस्था आहे. पाससाठी अजूनही लोकांकडून विनंती अर्ज येत आहेत. मोदींचे भाषण अभूतपूर्ण होईल, अशी लोकांची अपेक्षा आहे. शंभर वर्षांपूर्वी स्वामी विवेकानंद यांनी शिकागोमध्ये भाषण दिले होते, तसेच भाषण हाेण्याची लोकांना आशा आहे.

२० हजारांपेक्षा अधिक लोकांशी भेट
मोदींच्या या रॅलीसाठी ओव्हरसीसी फ्रेंड्स ऑफ बीजेपीचे संयोजक वीज जोली आणि खासदार राज्यवर्धन राठोड यांनी मेडिसन स्क्वेअर गार्डन निश्चित करण्यापूर्वी अमेरिकेच्या पूर्व ते पश्चिम, उत्तर ते दक्षिणपर्यंत जवळपास २० शहरांचा दौरा केला होता. यादरम्यान त्यांनी २० हजारांपेक्षा अधिक लोकांची भेट घेतली. या भेटीदरम्यान लोकांनी मोदींच्या लाल िकल्ल्यावरील भाषणाची मागणी करण्यात आली. मोदींच्या रॅलीसाठी पोहोचलेल्या या नेत्यांना गुरुद्वारामध्ये प्रवेशच दिला नाही तर त्यांचा मानसन्मानही करण्यात आला. सर्वसामान्यपणे तेथील गुरुद्वारामध्ये राजकीय व्यक्तींना प्रवेश दिल्या जात नाही.

असा झाला प्रवास : जोली यांनी सांगितले की, मोदींच्या रॅलीचे स्थळ निश्चित करण्यासाठी जवळपास २० शहरांचा दौरा करण्यात आला. ज्या प्रमुख शहरांचा दौरा करण्यात आला, त्यामध्ये लॉस एंजलीस, वेगास टेक्सास, बोस्टन, अटलांटा, शिकागो, न्यूयॉर्क आणि न्यू जर्सी यांचा समावेश आहे. यातील काही अमेरिकन भारतीय तर स्वत:च्या खर्चाने पूर्ण कार्यक्रम आयोजित करण्याचा प्रस्ताव देत होते.
शीख समुदायाला हवा न्याय
अमेरिकेत स्थायिक झालेला शीख समुदाय खूप उत्सुक आहे. मोदी यांनी आपल्याला न्याय द्यावा, अशी त्यांची अपेक्षा आहे. परमिंदर सिंह यांनी भास्करशी बोलताना सांगितले की, १९८४ च्या दंगलीनंतर अनेक शीख अमेरिकेत आले होते आणि त्यांनी राजनैतिक संरक्षण व आश्रय मागितला होता. तेव्हाची परिस्थिती वेगळी होती. तसेच दंगलीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या काँग्रेसचे माजी खासदार टाईटलर व सज्जन कुमार यांच्याविरुद्धचे प्रकरण लवकर निकाली काढण्याची मागणी करणार आहे. शीख दंगलीच्या सुनावणीसाठी फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करण्यात यावे व येत्या काही महिन्यात त्यांची सुनावणी पूर्ण व्हावी.

असा असेल मोदींचा दौरा
मोदी २६ सप्टेंबरला न्यूयॉर्कसाठी रवाना होणार आहेत २८ सप्टेंबर रोजी ते मेडिसन स्क्वेअर गार्डनमध्ये भारतीयांना संबोधित करतील. याच दविशी सायंकाळी अमेरिकेतील भारतीय राजदूत एस. जयशंकर यांच्या वतीने आयोजित रात्री भोजनाला उपस्थित राहतील. तेथे भारतीय आणि अमेरिकन नेते, नागरिकांशी संवाद साधणार आहेत. २९ सप्टेंबर रोजी ते अमेरिकेच्या प्रमुख उद्योगपतींशी चर्चा करणार आहेत. जापानसारखीच मोठी गुंतवणूक आणण्याचा ते या वेळी प्रयत्न करणार आहेत. ३० सप्टेंबर रोजी पंतप्रधान वाशिंग्टनला जातील. तेथे ओबामा यांच्याबरोबर शिखर वार्ता होईल. या भेटीकडे जगाचे लक्ष लागले आहे. विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते सय्यद अकबरुद्दीन यांनी सांगितले की, हा दौरा अविस्मरणीय राहण्यासाठी विदेश मंत्रालय प्रयत्न करीत आहे.