आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • PM Narendra Modi Says, Judiciary Should Be Both Powerful And Perfect

\'न्याय यंत्रणा कायद्यांच्या गुंत्यात, 700 कायदे रद्द करण्याची प्रक्रिया सुरु\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- देशाची न्यायालयीन यंत्रणा कायद्यांच्या गुंत्यात अडकली आहे. न्याय यंत्रणा अधिक सक्षम आणि शक्तीशाली करण्याची गरज असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (रविवारी) सांगितले. माझ्या कारकिर्दीत दररोज एक असे तब्बल 700 कालबाह्य झालेले कायदे रद्द केले जातील, अशी माहिती नरेंद्र मोदींनी दिली. दिल्लीतील विज्ञान भवनात देशभरातील मुख्य न्यायाधीश व मुख्यमंत्र्यांच्या परिषदेत नरेंद्र मोदींनी संबोधले.
अनावश्यक कायदे न्यायप्रक्रियेत अडथळे ठरत असल्यामुळे हे कायदे मोडीत काढण्याचे केंद्र सरकारने हाती घेतल्याची माहिती नरेंद्र मोदींनी दिली. देशातील न्यायव्यस्थेत अडकलेले कोट्यवधी खटले निकाली काढण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे काम सुरु असून देशातील विविध राज्यातील काही कायद्यांनाही कात्री लावण्याचा सल्ला मोदींनी सर्व मुख्यमंत्र्यांना दिला आहे.
न्यायाधीशांचे काम सर्वांपेक्षा वेगळे, त्यांच्यावर सर्वात मोठी जबाबदारी असते. तसेच न्यायालयीन प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करण्याची आवश्यकता आहे. न्यायाधीश सामान्य जनतेमधून आले असतील. परंतु या कामासाठी परमेश्वरानेच त्यांची निवड केलेली असते. देशवासियांना त्यांच्याकडून खूप अपेक्षा असतात. सामान्य व्यक्तीकडून चूक झाली तर त्याला सुधारण्याची संधी दिली जाते. परंतु, न्यायाधिशांना दुसरी संधी मिळत नसल्याचे, मोदीनी सांगितले.

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, पंतप्रधान मोदींना धर्मनिरपेक्षतेचा सल्ला....