आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • PM Narendra Modi Travel In Delhi Metro News In Marathi

PM नी पहिल्यांदाच केला मेट्रोतून प्रवास, मोदींनी \'Twitter\'वर दिली माहिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (शनिवार) पहिल्यांदाच दिल्लीत मेट्रोतून प्रवास केला. मोदींनी आपला ताफा सोडून रेसकोर्स ते द्वारका स्थानकादरम्यान मेट्रो प्रवास करून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला. यावेळ‍ी मोदींसोबत यावेळी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल होते. पंतप्रधान मोदींनी आपल्या मेट्रो प्रवासाची माहिती स्वत: 'ट्‍वीट'द्वारे दिली.
मोदींच्या मागील-पुढील सीट्‍स रिकाम्या ठेवण्‍यात आल्या होते. तसेच एसपीजीचे सुरक्षा अधिकारी मेट्रोच्या डब्यात तैनात होते. द्वारका येथे एका कार्यक्रमासाठी मोदी निघाले होते. तेव्हा त्यांनी आपला ताफा सोडून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची निवड केली. दिल्लीत मेट्रो सुरु झाल्यापासून पहिल्यांदाच देशाच्या पंतप्रधानांनी मेट्रोतून प्रवास केला आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, पंतप्रधान मोदींचे ट्‍वीट...