आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमेरिका दौरा : या चुकांमुळे संयुक्त राष्ट्रांत नरेंद्र मोदींनी केलेल्या भाषणावर होत आहे टीका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संयुक्त राष्ट्राच्या आमसभेसमोर केल्या जाणा-या भाषणाबाबत सर्वांनाच मोठी उत्सुकता होती. भाषणाच्या आपल्या विशिष्ट शैलीसाठी प्रसिद्ध असणारे मोदी संयुक्त राष्ट्राच्या आमसभेच मात्र काहीसे चलबिचल असल्याचे जाणवले. सुमारे 12 वर्षांनंतर याठिकाणी हिंदीत भाषण करण्यात आले. पण त्यात उच्चारासह अनेक चुका समोर आल्या होत्या. या पाच चुकांमुळे मोदींचे भाषण विरोधकांच्या टीकेचे लक्ष्य ठरू शकते.

पहिली चूक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या अध्यक्षांच्या नावाचा चुकीचा उच्चार केला. त्यांनी सॅम कुटेसा (Sam Kutesa) ऐवजी सॅम कुरेसा म्हटले.

दुसरी चूक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आमसभेच्या भाषणात 69 व्या सत्राचा उल्लेख केला. त्यावेळी ते हिंदी आणि इंग्रजी एकत्रित बोलले. ते 69 वे सत्र ला 'सिक्सटी नाइंथवे' सत्र म्हणाले.

तिसरी चूक
देशाच्या लोकसंख्येचा उल्लेख करत मोदी म्हणाले की, भारत वन वॉईंट ट्वेंटी फाइव्ह (1.25) बिलियन लोकांचा देश आहे. म्हणजे दशांश नंतरचे आकडेही मोदींनी सोबतच वाचले. पण त्याला प्रत्यक्षात वन पॉइंट टू फाइव्ह (1.25) म्हटले जाते. हे उच्चारताना मोदींचा आत्मविश्वास काहीसा कमी वाटला.

चौथी चूक
भाषणादरम्यान अनेक शब्दांचे उच्चार मोदींकडून चुकीचे झाले. प्रकृतिला ते दोनवेळा 'प्रकुर्ति' म्हणाले. समुद्रला समिद्र आणि समृद्धीला समुर्द्धी म्हणाले. सम्मानलाही मोदी सन्मान म्हणाले.

15 मिनिटांऐवजी 35 मिनटे बोलले
संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेला संबोधित करण्यासाठी कोणत्याही राष्ट्राच्या प्रतिनिधीला 15 मिनटांची वेळ दिला जातो. पण भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 35 मिनिटे भाषण करत होते.

(मोदींचे संपूर्ण भाषण वाचण्यासाठी याठिकाणी क्लिक करा)