आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PM मोदी यांनी वर्षभरात केला 19 देशांचा दौरा, आता कुठे जाणार वाचा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतल्‍यानंतर म्‍हणजे 26 मे 2014 पासून आजपर्यंत 12 वेळा विदेश दौरे केले आहेत. यादरम्‍यान त्‍यांनी 19 देशांना भेटी दिल्‍या आहेत. माहितीच्‍या अधिकाराव्‍दारे मागितलेल्‍या माहितीत पीएमओने या बाबीचा खुलासा केला आहे. नरेंद्र मोदी यांच्‍या 6 जुलैपासून सुरू होणा-या रशिया आणि मध्‍य एशियाच्‍या दौ-यापूर्वी ही माहिती समोर आली आहे. प्रधानमंत्री या वेळी रशिया आणि मध्‍य एशियाच्‍या पाच देशांचा दौरा करणार अाहेत.

अाता दौरा रशिया आणि मध्‍य एशियाचा
परस्‍परातील संबंध, आर्थिक आणि उर्जा क्षेत्रातील संबंध मजबूत करण्‍यासाठी पंतप्रधान 6 ते 13 जुलै या कालावधित रशिया आणि मध्‍य एशियाच्‍या 5 देशांच्‍या दौ-यावर जात आहेत. दरम्‍यान ते रशियामध्‍ये ब्रिक्‍स आणि सांघाई सहयोग संगठनाच्‍या (SSO) बैठकीत सहभागी होणार आहेत. उझबेकिस्तान , कझाकस्तान, रशिया, तुर्कमेनिस्तान, किरगिझस्तान आणि ताजिकिस्तान या देशांची यात्रा आता पंतप्रधान मोदी करणार आहेत.

भूटानपासून जर्मनीपर्यंत केली यात्रा
माहितीच्‍या अधिकारात मिळालेल्‍या माहितीनुसार पंतप्रधान माेदी यांनी वर्षभरात भूटान, नेपाळ, जपान, अमेरिका, म्‍यानमार, ऑस्‍ट्रेलिया, फिजी, सेशल्‍स, मॉरिशस,श्रीलंका, सिंगापूर, फ्रान्‍स, जर्मनी, कॅनडा, चीन, दक्षीण कोरिया, मंगोलिया, बांगलादेश अशा देशांचा दौरा केला आहे. यासाठी लखनौ येथील कार्यकर्ते संजय शर्मा यांनी पंतप्रधान कार्यालयात माहितीचा अधिकार दाखल केला होता.
पुढील स्लाईडवर पाहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विदेश दौऱ्यादरम्यानचे फोटो...
नोटः सर्व फोटो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या Instagram अकाऊंटवरून घेण्यात आले आहेत.