आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ख्रिसमसला ख्रिश्चन समुदायाच्या नेत्यासोबत पंतप्रधान करणार \'चाय पर चर्चा\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी ख्रिसमसनिमित्त येत्या 25 डिसेंबरला ख्रिश्चन समुदायातील नेत्यांसोबत 'चाय पर चर्चा' या कार्यक्रमांर्तगत चर्चा करणार आहेत. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या घरी या 'टी-पार्टी'चे आयोजन करण्‍यात येणार आहे.

इंग्रजी वृत्तपत्र ‘द टेलिग्राफ’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, पंतप्रधान मोदी यांच्यासाठी जेटली यांनी ही टी-पार्टी आयोजित केली आहे. टी-पार्टीसाठी ख्रिश्चन समुदायातील दिग्गज नेत्यांना आमंत्रित करण्‍यात आले आहे. ख्रिश्चन समुदायासमोर सरकारची प्रतिमा सुधारणे हा या टी-पार्टीचा उद्देश असल्याची चर्चा सुरु आहे.

ख्रिश्चन नेत्यासाठी आयोजित करण्यात आलेली टी-पार्टी यशस्वी झाल्यानंतर पंतप्रधान मोदी मुस्लिम नेत्यांसोबत चर्चा करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

ख्रिसमसनिमित्त टी-पार्टीचे आयोजन करण्‍याची कल्पना केरळमधील एका भाजप नेत्याच्या सूपीक डोक्यातून बाहेर आली आहे. अल्फोंस कन्नाथनम असे या नेत्याचे नाव असून त्यांनी गेल्यावर्षी डाव्या पक्षातून (लेफ्ट फ्रंट) भाजपमध्ये प्रवेश केला होता. अल्फोंस आयएएस अधिकारी होते. मात्र, त्यांना 2006 मध्ये नोकरीचा राजीनामा दिला होता. कन्नाथनम हे लेफ्ट फ्रंटच्या पाठिंब्यावर ख्रिश्चन बहुल कन्जीरापल्ली येथून निवडून आले होते.

नितीन गडकरीचे निकटवर्तीय आहेत अल्फोंस
- अल्फोंस कन्नाथनम यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे निकटवर्तीय मानले जाते.
- 1994 मध्ये ‘टाइम मॅगझिन’ने अल्फोंस यांना '100 यंग ग्लोबल लीडर्स'च्या यादीत स्थान दिले होते.
- कन्नाथनम यांना केरळमधील एका जर्नालिस्टची मदत लाभत आहे. हा जर्नालिस्ट सध्या दिल्लीत आहे.