आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • PM Narendra Modi Will Donate Money To NGO After Sealing His Suit

\'नरेंद्र दामोदरदास मोदी\' नाव असलेल्या सुटचा PM मोदी करणार लिलाव? NGO ला देणार रक्कम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 'नरेंद्र दामोदरदास मोदी' नाव असलेला सुट पुन्हा चर्चेत आला आहे. बराक ओबामा भारताच्या दौऱ्यावर आले होते तेव्हा मोदींनी हा सुट परिधान केला होता. त्याची तेव्हा बरीच खुसखुशीत चर्चा झाली होती. नंतर विरोधकांनी या सुटच्या किमतीवरुन आणि नावावरुन मोदींना चांगलेच टार्गेट केले होते. आता नरेंद्र मोदी हा सुट विकणार असल्याची चर्चा आहे.
'नरेंद्र दामोदर मोदी' असा मोनोग्राम असलेला सुट विकून त्यातून मिळणारी रक्कम समाज कल्याणासाठी वाराणसीच्या एखाद्या एनजीओला दिली जाणार आहे. बराक ओबामा भारताच्या दौऱ्यावर आले होते तेव्हा दिल्लीच्या हैदराबाद हाऊसमधील कार्यक्रमाच्या वेळी मोदींनी हा सुट धारण केला होता. सुट विकून त्यातील रक्कम एजीओला द्यावी, अशी कल्पना केंद्र सरकारमधील एका मंत्र्याने सादर केली असल्याचे समजते.
नुकत्याच झालेल्या दिल्ली विधानसभेत भाजपला दारुण पराभव झाला. यावेळी कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सुटवरुन मोदींना चांगलेच धारेवर धरले होते. त्यांनी याला 10 लाखांचा सुट असे म्हटले होते. राजकीय विश्लेषक सांगतात, की याचा थेट लाभ आम आदमी पार्टीला झाला. सुटमुळे मोदी श्रीमंत झाले, असा जनतेचा समज झाला. मी चाहा विकणारा आहे असे सांगून मोदींनी लोकसभा निवडणुकीत जनतेला मतदान करण्याचे आवाहन केले होते, हे विशेष. भाजपच्या वरिष्ठ पातळीवरही या सुटवर दबक्या आवाजात चर्चा सुरु असल्याचे सांगितले जाते.
पुढील स्लाईडवर बघा, 'नरेंद्र दामोदरदास मोदी' नाव असलेला सुट घालून नरेंद्र मोदी...