आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींनी केले राहुल गांधींना बर्थडे विश, ट्विटरवर #VishwaPappuDiwas

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. PM नी ट्विटद्वारे राहुल गांधींना 45 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी ट्विटमध्ये राहुल गांधींना चांगले आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. वाढदिवसाच्या शुभेच्छा मिळाल्यानंतर राहुल गांधी यांनी सुमारे दोन तासांनंतर त्याचे उत्तर देत आभार मानले. दरम्यान ट्विटरवर राहुल गांधींना मोठ्या प्रमाणावर शुभेच्छा दिल्या जात आहेत. सकाळी #HAPPYBIRTHDAYRG ट्रेंडमध्ये होते तर दुपारपर्यंत यूझर्स #VishwaPappuDiwas आणि #PapaHainNa अशा हॅशटॅगने ट्विट करू लागले होते.

पंतप्रधान मोदींनी केलेले ट्विट
Narendra Modi ‏@narendramodi: Wishing the Congress Vice President, Shri Rahul Gandhi a Happy Birthday. I pray for his good health & long life. @OfficeOfRG.

राहुल गांधींचे उत्तर
Office of RG ‏@OfficeOfRG: Thank you for your best wishes @narendramodi.
या दरम्यान राहुल गांधी यांच्या आई आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधीही त्यांना भेटण्यासाठी आल्या.

#HappyBirthdayRG ट्रेंडींगमध्ये
ट्विटरवर #HappyBirthdayRG सकाळपासूनच ट्रेंडमध्ये आहे. या हॅशटॅगचा वापर करून सोशल मीडिया यूझर्स राहुल गांधींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. काँग्रेसचे अनेक नेते या हॅशटॅगचा वापर करून राहुल गांधींना शुभेच्छा देत आहेत.

* Sanjay Nirupam ‏@sanjaynirupam: Many many hpy returns of the day Rahulji @OfficeOfRG. V r celebrating in various area by extending hand to needy ppl
* Priyanka Chaturvedi ‏@priyankac19: Best wishes to our VP on his birthday! #HappyBirthdayRG
* digvijaya singh ‏@digvijaya_28: Many Happy Returns of the day to Rahul Ji #HappyBirthDayRG

10 वर्षांत प्रथमच देशात वाढदिवस
गेल्या दहा वर्षांपासून राहुल गांधी परदेशात वाढदिवस साजरा करत होते. 2004 पासून 2014 पर्यंत त्यांनी परदेशी वाढदिवस साजरा केला. त्यामुळे कार्यकर्त्यांसाठीही राहुल गांधींचा यंदाचा वाढदिवस खास आहे. कारण यावेळी ते दिल्लीतच असणार आहे. काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी त्यांना अनेकदा देशात वाढदिवस साजरा करण्याची मागणी केली आहे.

45 किलोचा केक
काँग्रेसचे कार्यकर्ते राहुल गांधी यांच्या निवासस्थानी म्हणजे 12, तुघलक रोड येथे त्यांच्या 45 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने 45 किलोचा केक कापणार आहेत. राहुल गांधींच्या घरापर्यंत कार्यकर्ते एक मिरवणूक काढण्याचीही शक्यता आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, राहुल गांधींना मोदींनी ट्विटद्वारे दिलेल्या शुभेच्छा...
बातम्या आणखी आहेत...