आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोदींनी राहुल गांधींना असे केला होते बर्थडे विश, Twitterवर #VishwaPappuDiwas

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा येत्या 19 जूनला वाढदिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी यांना गेल्यावर्षी 45 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. मोदी यांनी राहुल गांधींना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या होत्या. वाढदिवसाच्या शुभेच्छा प्राप्त‍ झाल्यानंतर राहुल गांधी यांनी तब्बल दोन तासांनंतर शुभेच्छांना उत्तर देत आभार मानले होते.

Twitterवर #VishwaPappuDiwas
दरम्यान ट्विटरवर राहुल गांधींना मोठ्या प्रमाणावर शुभेच्छा दिल्या जात होत्या. सकाळी #HAPPYBIRTHDAYRG ट्रेंडमध्ये होते. मात्र, दुपारपर्यंत यूझर्स #VishwaPappuDiwas आणि #PapaHainNa अशा हॅशटॅगने ट्वीट करताना दिसत होते.

पंतप्रधान मोदींनी केलेले ट्विट
Narendra Modi ‏@narendramodi: Wishing the Congress Vice President, Shri Rahul Gandhi a Happy Birthday. I pray for his good health & long life. @OfficeOfRG.

राहुल गांधींचे उत्तर
Office of RG ‏@OfficeOfRG: Thank you for your best wishes @narendramodi.
ट्रेंडींगमध्ये होते #HappyBirthdayRG ट्विटरवर #HappyBirthdayRG सकाळपासूनच ट्रेंडमध्ये होते. या हॅशटॅगचा वापर करून सोशल मीडिया यूजर्स राहुल गांधींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत होते. आश्चर्याची गोष्‍ट म्हणजे काँग्रेसचे काही नेते याच हॅशटॅगचा वापर करून राहुल गांधींना शुभेच्छा देत होते.

* Sanjay Nirupam ‏@sanjaynirupam: Many many hpy returns of the day Rahulji @OfficeOfRG. V r celebrating in various area by extending hand to needy ppl

* Priyanka Chaturvedi ‏@priyankac19: Best wishes to our VP on his birthday! #HappyBirthdayRG

* digvijaya singh ‏@digvijaya_28: Many Happy Returns of the day to Rahul Ji #HappyBirthDayRG

कापला होता 45 किलोचा केक
राहुल गांधी यांच्या वाढदिवशी काँग्रेसचे कार्यकर्ते 12, तुघलक रोड येथे 45 किलोचा केक घेऊन आले होते. राहुल गांधींच्या घरापर्यंत कार्यकर्त्यानी एक मिरवणूक काढली होती.
येत्या 19 जून रोजी राहुल गांधी यांचा 46 वा वाढदिवस आहे. या दिवशी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काय नियोजन आहे. ट्‍विटरवर काय ट्रेडींगमध्ये राहिले, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, राहुल गांधींना मोदींनी ट्विटद्वारे दिलेल्या शुभेच्छा व राहुल गांधींचे सोशल मीडियावर शेअर झालेले काही निवडक फोटो..

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...