नवी दिल्ली - पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांच्या सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार आज झाला. मोदींच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेना सहभागी झाली नाही. शिवसेनेचे राज्यसभा खासदार अनिल देसाई दिल्ली विमानतळावर दाखल झाले मात्र, दुपारी दीड पर्यंत ते विमानतळाबाहेर पडले नाही. पंतप्रधान मोदी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात सकारात्मक चर्चा न झाल्यामुळे शपथविधी सोहळ्यात सहभागी होणार नसल्याचे खासदार आनंदराव अडसूळ यांनी सांगितले. अनिल देसाई मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी दिल्लीत आले होते, मात्र ते आल्या पावली मुंबईला परतले. राष्ट्रपती भवनातील अशोका हॉलमध्ये आज झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात चार कॅबिनेट मंत्री, 14 राज्यमंत्री आणि तीन स्वतंत्र प्रभार असलेल्या मंत्र्यांना राष्ट्रपतींनी शपथ दिली.
सर्वप्रथम मनोहर पर्रीकर यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. सुरेश प्रभू, जे. पी. नड्डा आणि बीरेंद्र सिह कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर स्वतंत्र प्रभार असलेले बंडारू दत्तात्रय, राजीव प्रताप रुडी आणि महेश शर्मा यांनी शपथ घेतली. मुख्तार अब्बास नकवी, रामकृपाल यादव, हरिभाई चौधरी, सांवरलाल जाट, मोहन कुंदरिया, गिरिराज सिंह, हंसराज आहिर, रामशंकर कठेरिया, वाय. एस. चौधरी आणि जयंत सिन्हा, राज्यवर्धनसिंह राठोड, बाबुल सुप्रियो, साध्वी निरंज ज्योति, विजय सांपला यांनी राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
पुढील स्लाइडमध्ये जाणून घ्या, कोण कोण झाले मंत्री