आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • PM Narendra Modis Guru Dayanand Saraswati Passes Away

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे गुरू स्वामी दयानंद गिरींचे निधन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऋषीकेश- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आध्यात्मिक गुरू स्वामी दयानंद गिरी (87) यांचे बुधवारी रात्री साडे दहा वाजता निधन झाले. शीशम झाडी आश्रमात त्यांची प्राणज्योत मालवली. मागील काही दिवसांपासून ते आजारी होते. नरेंद्र मोदी यांनी 11 सप्टेंबरला त्यांची भेट घेतली होती.

स्वामी दयानंद गिरी यांच्या पार्थिव आज (गुरूवार) पूर्ण दिवस भक्तांसाठी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. शुक्रवारी सकाळी स्वामी दयानंद गिरी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्‍यात येणार आहेत.

मागील काही दिवसांपासून जौलीग्रांट हॉस्पिटलमध्ये त्यांच्या उपचार सुरु होते. नरेंद्र मोदी स्वामी दयानंद गिरी यांच्याकडून दीक्षा घेतली होती. त्यानंतर ते गुजरातचे मुख्यमंत्री बनले होते. मोदी भाजपचे राष्ट्रीय महामंत्री असताना 1999 मध्ये ऋषिकेशला आले होते.

'स्वामींच्या निधनाने वैयक्तिक नुकसान झाले', अशी प्रतिक्रिया देत नरेंद्र मोदी यांनी 'ट्विटर'वरून शोक व्यक्त केला आहे.