आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • PM Narendra Modi’S Nepalese Protege To Accompany Him To Nepal

नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी कोईरालांनी तोडला प्रोटोकॉल; संसदेत संबोधित करणार मोदी!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली/काठमांडू- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (रविवार) सकाळी अकरा वाजता नेपाळमध्ये पोहोचले. मोदींना 21 तोफांची सलामीही देण्यात आली. स्वत: नेपाळचे पंतप्रधान सुशिलकुमार कोईराला एअरपोर्टवर उपस्थित होते.

मोदी दोन दिवसीय नेपाळ दौर्‍यावर आहेत. उल्लेखन‍िय म्हणजे त्यांच्यासोबत त्यांचा 'मानसपूत्र' एक नेपाळी तरुणही आहे. मोदी या युवकाला त्याच्या आई-वडिलांकडे सुपूर्द करणार आहे. मोदीच्या मते, 12 वर्षीय हा तरुण अहमदाबादमध्ये अतिशय लाचार परिस्थितीत सापडला होता. त्यानंतर मोदींनी त्यांची देखरेख केली होती. यामुळे मोदींच्या नेपाळ दौर्‍याला वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे.

विशेष म्हणजे मोदींचा हा दौरा तीन कारणांमुळे चर्चेत येण्याची शक्यता आहेत.
1.मागील 17 वर्षांनंतर नरेंद्र मोदी नेपाळचा दौरा करणार आहेत.
2.नेपाळचे पंतप्रधान सुशील कोईराला शिष्टाचार तोडून नरेंद्र मोदींचे स्वागत करणार आहेत.
3. नेपाळच्या संसदेत संबोधित करणारे नरेंद्र मोदी हे भारताचे पहिले पंतप्रधान ठरणार आहेत.

नरेंद्र मोदी या दौर्‍यात व्यापार, आर्थिक तडजोड, सीमा सहकार्य, संरक्षण आणि पर्यटनसारख्या मुद्यांवर चर्चा करणार आहेत.

मोदींचा कार्यक्रम:
9.10: पंतप्रधान मोदी दिल्‍लीहून नेपाळसाठी रवाना

11.00: मोदींचे विमान काठमांडू एअरपोर्टवर उतरेल. एअरपोर्टवर नेपाळचे मुख्यमंत्री सुशीलकुमार कोईराला मोदींचे स्वागत करतील. नेपाळमध्ये पंतप्रधान कोईराला पहिलांदा शिष्टाचार तोडून मोदींच्या स्वागतासाठी एअरपोर्टवर उपस्थित राहणार आहेत.

11.30: नरेंद्र मोदी यांचा ताफा एअरपोर्टहून काठमांडूमधील हयात हॉटेलमध्ये पोहोचेल.

दुपारी 12.00: नरेंद्र मोदी नेपाळचे परराष्ट्रमंत्री महेंद्र पांडे यांच्यासोबत हॉटेलमध्ये लंच करतील.

दुपारी 2.00: हयात हॉटेलमधून नेपाळचे पंतरप्रधान कार्यालय सिंह दरबाराठी रवाना होती. सिंह दरबारमध्ये दोन देशांचे प्रतप्रधान चर्चा करतील.

सायंकाळी 4.00: नेपाळच्या संसदेत नरेंद्र मोदी संबोधित करतील. नेपाळच्या संसदेत भारताचे पंतप्रधान इतिहासात पहिल्यादा संबोधित करणार आहेत. मोदींचे भाषणाचे नेपाळमधून थेट प्रक्षेपण केले जाणार आहे.

सायंकाळी 6.00: नरेंद्र मोदी हे भारतीय राजदूत रंजीत राय यांनी आयोजित केलेल्या कार्याक्रमात सहभागी होती.

रात्री 8.00: नरेंद्र मोदींच्या सन्मानार्थ नेपाळचे पंतप्रधान सुशीलकुमार कोईराला काठमांडूमधील एका हॉटेलमध्ये दावत देतील.

मोदींचा 'मानसपूत्र'
जीत बहादुर नामक एक तरुण सध्या अहमदाबादमध्ये एमबीए करतोय. मोदींच्या मते, जीन बहादुर अवघ्या 12 वर्षांचा असताना अहमदाबादमध्ये सापडला होता. नंतर मोदींनी जीतचे पालकत्त्व स्विकारले होते. त्याचा सांभाळ करून त्याला शिक्षणासाठी सहकार्य केले होते. जीत बहादुर याचे कुटूंबीय त्याला नरेंद्र मोदी यांचा मानसपूत्र मानतात. जीतची आई खगिसरा साहू म्हणाल्या, मी जीतला फक्त जन्म दिला आहे. परंतु नरेंद्र मोदी यांनी त्याला आयुष्य आहे.

मोदी यांनी 'ट्वीट'च्या माध्यमातून दिली माहिती...
जीत बहादुर गुजरातमधील अहमदाबादमध्ये कुठल्या अवस्थेत सापडला होता, याबाबत मोदींची ट्‍वीटकरून ही माहिती दिली आहे. जीत होतकरू आहे. त्याला शिक्षणासाठी मोदींनी सहकार्य केले.
मोदींनी ट्वीटमध्ये म्हणाले, नेपाळ दौर्‍यासोबत माझ्या वैयक्तीक भावना जुळल्या आहेत. गेल्या काही वर्षांपूर्वी जीत बहादूर नामक एक 12 वर्षीय मुलगा लाचार अवस्थेत मला सापडला होता. कुठे जायचे आहे? काय करायचे आहे? हेही त्याला माहीत नव्हते. अहमदाबादमध्ये तो कोणालाच ओळखत नव्हता. गुजरातीच काय तर त्याला हिंदी भाषाही व्यवस्थेत समजत नव्हती. परमेश्वराकडून मिळालेल्या प्रेरणेतून मी जीतला सहकार्य करण्याचे ठरवले. त्याचे पालकत्त्व स्विकारले. त्याचा सांभाळ केला. त्याला शिक्षण दिले. आता तो एमबीए करतो. विशेष म्हणजे त्याला गुजराती भाषा समजते."

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा, काठमांडूत झाले नरेंद्र मोदींचे भव्य स्वागत...

(फोटो: काठमांडूमधील त्रिभुवन एअरपोर्टवर नेपाळचे पंतप्रधान सुशिलकुमार कोईराला यांनी मोदीचे स्वागत केले. )