आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंतप्रधान मोदी आता फ्रान्स, जर्मनी, कॅनडाच्या दौऱ्यावर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा विदेश दौऱ्यावर जात आहेत. हा दौरा १० ते १६ एप्रिलदरम्यान आहे. या दौऱ्यात पंतप्रधान फ्रान्स, जर्मनी आणि कॅनडाला जाणार आहेत.
आर्थिक संबंध वाढवणे असा या दौऱ्याचा उद्देश असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी फेसबुकवर म्हटले आहे. तरुणाईसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे हाही उद्देश असल्याचे त्यांनी काॅमेंटमध्ये म्हटले आहे.

फ्रान्स : मेक इन इंडियावर चर्चा :
मोदी फ्रान्समध्ये मेक इन इंडिया अभियानात मदतीसाठी आग्रह करतील. संरक्षण क्षेत्रावर त्यात भर राहील. मॅन्युफॅक्चरिंग, रेल्वे आणि इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात फ्रान्सबरोबर सहकार्याच्या अनेक संधी आहेत.

जर्मनी : युरोपीय समुदायाला निर्यातवाढीवर चर्चा :
जर्मनी ही युरोपीय समुदायातील (ईयू) सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. निर्यातवाढीवर चर्चा होणार आहे. तेथून जास्तीत जास्त गुंतवणूक आकर्षित करण्यावर भर राहील.

कॅनडा : अणुऊर्जा इंधनावर चर्चा :
पंतप्रधान स्टीफन हार्पर यांच्याशी अणुऊर्जा करारावर चर्चा होईल. भारतातील अणुऊर्जा प्रकल्पांना युरेनियम उपलब्ध करून देण्याबाबत भर राहील. मोदी यांनी सांगितले, मॅन्युफॅक्चरिंग, इन्फ्रास्ट्रक्चर , शिक्षण, कौशल्य विकास, संशोधन, अन्न सुरक्षा क्षेत्रात कॅनडा मोठे सहकार्य करू शकतो. मोदी टोरँटो कॅनडातील उद्योजकांची भेट घेतील. टोरँटो आणि व्हँक्युअरमध्ये भारतीय वंशांच्या लोकांशी माेदी संवाद साधणार आहेत.