नवी दिल्ली - सोशल मीडियावर व्यक्त होणार्या बिनधास्त भावना आणि पोस्ट एकप्रकारे जनतेला नेमके हवे काय, हे सांगणारे हक्काचे व्यासपीठच आहे. देशाची ही नेमकी नाडी पकडून जनतेचा कल जाणून घेण्यासाठी आता पंतप्रधान कार्यालयही सरसावले आहे.
ट्विटर,
फेसबुक आणि विविध ब्लॉगवर या यंत्रणेची करडी नजर आहे.
सूत्रांनुसार, 25 जूनपासून माहिती-प्रसारण मंत्रालयामार्फत सोशल मीडियावरील या ट्रेन्ड्सचा अहवाल पंतप्रधान कार्यालयास पाठवला जात असून रोज सकाळी साडेनऊपर्यंत पहिला अहवाल पाठवला जातो. यासाठी मंत्रालयात 20 तज्ज्ञांचे एक पथक सोशल मीडियावरील प्रत्येक बाबीचे बारकाईने निरीक्षण करून त्याचे विश्लेषण करत आहेत रेल्वे भाडेवाढ व इतर संवेदनशील मुद्द्यांवर केले जाणारे ट्विट व इतर माहितीचा अहवालच सध्या पंतप्रधान कार्यालयाकडे पाठवला जात आहे. देशातील जनतेचा कल जाणून घेण्यासाठी पंतप्रधानांनी स्वत:हून यात पुढाकार घेतल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.