आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • PM Rejects BJP’s Demand To Appear Before JPC On 2G

जेपीसीसमोर येणार नाही - पंतप्रधान

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - टू जी प्रकरणात संयुक्त संसदीय समितीसमोर (जेपीसी) हजर होण्याची मागणी पंतप्रधानांनी फेटाळली आहे. भाजप नेते यशवंत सिन्हा पंतप्रधान मनमोहन सिंग यांना पत्राद्वारे ही मागणी केली होती.
पंतप्रधानांनी बुधवारी सिन्हा यांना पत्राचे उत्तर दिले. त्यात त्यांनी म्हटले की, जेपीसीजवळ सर्व कागदपत्रे आहेत. माझ्याकडे लपवण्यासारखे आता काहीच नाही. सिन्हा यांनी पंप्रधानांना लिहिलेल्या पत्रात त्यांना जेपीसीसमोर हजर राहण्याची मागणी केली होती. साक्ष कोणाची घ्यावयाची हे जेपीसी व त्याचे अध्यक्ष ठरवतील. पंतप्रधानांच्या पत्रावर भाजपने नाराजी व्यक्त केली आहे. भाजप नेते शाहनवाज हुसैन म्हणाले की, दाल में कुछ काला है. यामुळेच पंतप्रधान जेपीसमोर येण्यास घाबरतात. जेपीसीचे काम अंतिम टप्प्यात आहे. संसद अधिवेशनाच्या दुसर्‍या टप्प्यात जेपीसी अहवाल सादर करेल, अशी अपेक्षा आहे. दुसरा टप्पा 22 एप्रिलपासून सुरू होणार आहे.

सिन्हा यांनी दिला राजाचा हवाला
सिन्हा यांनी आपल्या पत्रात माजी दूरसंचारमंत्री ए. राजाचा हवाला दिला होता. राजा यांनीही पंतप्रधानांना जेपीसीसमोर हजर राहावे, अशी मागणी केली होती. राजाने पंतप्रधानांवर गंभीर आरोप केले आहेत, असे सिन्हा यांचे म्हणणे आहे. पंतप्रधान लोक लेखा समितीसमोर साक्ष देण्यास तयार असतील तर जेपीसीसमोर का नाही, असा सवाल त्यांनी केला.