आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नोटबंदीवर पंतप्रधानांनी मागितली थेट जनतेची मते! नरेंद्र मोदी अॅपवर सुरू झाला सर्व्हे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - नोटबंदीवरून विरोधी पक्षांनी चालवलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी आता थेट जनतेचे मत मागवले आहे. नरेंद्र मोदी अॅपवर यासाठी एक सर्व्हे सुरू करण्यात आला असून यात जनतेला १० प्रश्न विचारण्यात आले आहेत. त्यावर मतेही मागवली आहेत. लोकांनी या सर्वेक्षणात अधिकाधिक संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मोदींनी केले आहे. या सर्वेबाबत मोदींनी केलेल्या ट्विटनंतर अॅप इतके व्यस्त झाले की, अनेकदा त्याची स्पीड कमी झाली.

अश्रू तरळले... : दरम्यान भाजप संसदीय पक्षाच्या बैठकीत खासदारांनी नोटबंदीच्या निर्णयाबाबत मोदींचे अभिनंदन केले. या वेळी बोलताना तीन वेळा मोदींच्या डोळ्यांत अश्रू तरळले. ते म्हणाले, विरोधी पक्ष नोटबंदीवरून अफवा पसरवत आहेत. हा निर्णय काळा पैसा आणि भ्रष्टाचार संपवण्यासाठीच घेतला. याविरुद्ध सुरू केलेल्या लढाईची ही सुरुवात आहे. नोटबंदीला सर्जिकल स्ट्राईक संबोधू नका, असे आवाहनही त्यांनी केले.
नरेंद्र मोदी अॅपवर विचारण्यात आले हे 10 प्रश्न
1 - तुम्हाला वाटते का, की भारतात काळापैसा आहे ?
- याला दोन पर्याय आहेत. - होय आणि नाही.
2 - तुम्हाला वाटते का, की भ्रष्टाचार आणि काळ्यापैशांविरोधात लढाई आणि ही समस्या दूर करण्याची गरज आहे ?
- याला दोन पर्याय आहेत. - होय आणि नाही.
3 - काळ्या पैशाविरोधात सरकारने उचलेल्या पाऊलांबद्दल तुम्हाला काय वाटते ?
- या प्रश्नाच्या उत्तरासाठी पाच पर्याय दिले आहेत. - कुचकामी आहे, कमकुवत आहे, ठिक आहे, प्रभावी आहे आणि अभुतपूर्व आहे.
4 - भ्रष्टाचाराविरोधात मोदी सरकारने आतापर्यंत उचलेल्या पाऊलांबद्दल तुमचे मत काय आहे ?
- या प्रश्नाच्या उत्तरासाठी पाच पर्याय दिले आहेत. - कुचकामी आहे, कमकुवत आहे, ठिक आहे, प्रभावी आहे आणि अभुतपूर्व आहे.
5 - 500-1000 रुपयांच्या जुन्या नोटा बंद करण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटते ?
- या प्रश्नाच्या उत्तरासाठी पाच पर्याय दिले आहेत. - कुचकामी आहे, कमकुवत आहे, ठिक आहे, प्रभावी आहे आणि अभुतपूर्व आहे.
6 - सरकारने घेतलेल्या डिमोनेटाइझेशन निर्णयामुळे काळापैसा, भ्रष्टाचार आणि दहशतवाद रोखण्यात मदत होईल का, याबद्दल तुम्हाला काय वाटते ?
- या प्रश्नाच्या उत्तरासाठी चार पर्याय आहेत. याचा तत्काळ परिणाम दिसेल, याचा परिणाम दिसण्यासाठी वेळ लागेल, एवढा प्रभावी निर्णय नाही, माहित नाही.
7 - डिमोनेटाइझेशनमुळे रियल इस्टेट, उच्च शिक्षण, आणि आरोग्याच्या सोयी सुविधा सामान्यांच्या आवाक्यात येतील ?
- याच्या उत्तरासाठी तीन पर्याय आहेत. - पूर्णपणे सहमत, काही प्रमाणात सहमत, सांगू शकत नाही.
8 - भ्रष्टाचार, काळापैसा, दहशतवाद आणि बनावट नोटांवर अंकूश ठेवण्याच्या लढाईत तुम्हाला किती असुविधा जाणवली ?
- यासाठी तीन पर्याय देण्यात आले आहेत. - कोणतीच असुविधा झाली नाही, थोडा त्रास झाला मात्र गरजेचे होते आणि होय, असुविधा जाणवली.
9 - भ्रष्टाचाराविरोधात लढणारे अनेक आंदोलक आणि नेते काळापैसा, भ्रष्टाचार आणि दहशतवादाच्या समर्थनार्थ लढत असल्याचे तुम्हाला वाटते का ?
- या प्रश्नाच्या उत्तरासाठी दोन पर्याय आहेत. - होय आणि नाही.
10 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तुम्ही कोणता सल्ला देऊ इच्छिता ?
- या प्रश्नाचे उत्तर पाच शब्दांमध्ये द्यायचे आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, एनएम अॅपवरील प्रश्न..
बातम्या आणखी आहेत...