आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • PM, Sonia Inaugurate Rs. 60 Crore Media Centre In Delhi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राजधानीत अद्ययावत मीडिया सेंटर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- राजधानीचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या रायसिना येथे 60 कोटी खर्चून बांधण्यात आलेल्या मीडिया सेंटरचे शनिवारी उद्घाटन झाले. पंतप्रधान मनमोहन सिंग व यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत झालेल्या एका समारंभात या केंद्राची सुरूवात झाली. सरकार आणि प्रसारमाध्यमे यांच्यातील महत्वाचा दुवा म्हणून हे सेंटर कार्य करेल, असा विश्वास उभय नेत्यांकडून व्यक्त करण्यात आला.

राष्ट्रीय मीडिया सेंटर म्हणजे दिल्लीतील आणखी एक महत्वाचे ठिकाण नाही, तर प्रसारमाध्यमासाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा देण्याची देशाची क्षमता दाखवणारी संस्था ठरेल. देशात दुमदुमणा-या प्रसारमाध्यमांचे प्रतिबिंब त्यात पाहता येईल, असे सिंग यांनी उद्घाटन प्रसंगी बोलताना सांगितले.
संवाद क्षेत्रातील सर्व गरजा एकाच खिडकीतून भागवण्याचे काम मीडिया सेंटरच्या माध्यमातून केले जाईल. भविष्याची गरज ओळखून देशाने संवाद क्षेत्रात टाकलेले महत्वाचे पाऊल म्हणून देखील या संस्थेची ओळख निर्माण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कसे आहे स्वरूप ? : मीडिया सेंटर राष्ट्रपती भवन व संसदेपासून जवळ आहे. इमारतीमध्ये प्रेस इन्फॉर्मेशन ब्यूरोची (पीआयबी) कार्यालये देखील इमारतीमध्ये आहेत. त्याशिवाय पत्रकार परिषदेसाठी मोठे सभागृह, पत्रकारांसाठी 24 वर्क स्टेशनची सोय, ग्रंथालय, विश्रांतीगृह, कॅफेटेरिया इत्यादी सुविधा येथे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

अद्ययावत : मीडिया सेंटरमध्ये इंटरनेट (वाय-फाय सुविधा ), वेबकास्ट, व्हिडिओ वाहिन्या, आयटीच्या इतर सुविधा, इंटरनेट टेलिफोनी, एव्ही व्हिडिओ वॉल या सुविधाही येथे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.