आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्‍वातंत्र्य @ 67: पाकिस्‍तानने दहशतवाद्यांना रोखावे- पंतप्रधानांचा इशारा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- देशाच्‍या 67 व्‍या स्‍वातंत्र्य दिनाला पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी ऐतिहासिक लाल किल्‍ल्‍यावर ध्‍वजारोहण केले. स्‍वातंत्र्य दिनाच्‍या भाषणात पंतप्रधानांनी पाकिस्‍तानाला इशारा दिला. भारतासोबत संबंध सुधारण्‍यासाठी पाकिस्‍तानने दहशतवादाला रोखणे आवश्‍यक असून भारताविरुद्ध कारस्‍थानांसाठी पाक‍िस्‍तानने आपल्‍या जमिनीचा वापर करु देऊ नये, असे पंतप्रधानांनी बजावले.

मनमोहनसिंग यांनी पंतप्रधान म्‍हणून सलग 10 वेळा ध्‍वजारोहण केले. पंतप्रधानांनी आयएनएस सिंधुरक्षक पाणबुडी बुडाल्‍याबाबत तीव्र शोक व्‍यक्त केला. नौदलाच्‍या 18 जवानांचा शोध अद्याप सुरु आहे. हे जवान शहीद झाल्‍याची भीती आहे. प्रत्‍यक्ष नियंत्रण रेषेवरील तणावाबाबत ते म्‍हणाले, की आपल्‍या जवानांवर भ्‍याड हल्‍ला करण्‍यात आला. अशा प्रकारच्‍या घटना रोखण्‍यासाठी सर्वतोपरी प्रयत्‍न करण्‍यात येतील. सरकार नक्षलवादाला रोखण्‍यात पूर्णपणे अपयशी ठरल्‍याची कबुलीही त्‍यांनी दिली.

मनमोहनसिंग यांनी उत्तराखंडमधील भीषण महापुराच्‍या कटू स्‍मृतिंना उजाळा देताना खेद व्‍यक्त केला. उत्तराखंडमधील बचाव कार्याचे त्‍यांनी कौतूक केले. बिहारमधील मध्‍यान्‍ह भोजन प्रकरणाबाबतही दुःख व्‍यक्त केले.