आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंतप्रधानांच्या श्रीलंका दौ-यास वाढता विरोध; अद्याप निर्णय नाही- सरकार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - पुढील आठवड्यात श्रीलंकेत होणा-या राष्ट्रमंडळ बैठकीत पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या सहभागाबाबत केंद्रीय मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांनी विरोध दर्शवला आहे. केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी कोणत्याही मंत्र्याचे नाव न घेता ही माहिती दिली; परंतु पंतप्रधानांच्या या बैठकीतील सहभागाबद्दल अद्याप कोणताच निर्णय घेण्यात आला नसल्याचेही त्यांनी सांगितले.

मागील वर्षी श्रीलंकेत झालेल्या गृहयुद्धादरम्यान तामिळी लोकांचा नरसंहार करण्यात आला होता. त्यामुळे तामिळनाडूमध्ये श्रीलंकेबाबत रोष आहे. म्हणूनच तामिळनाडूतील अण्णाद्रमुक, मुख्य पक्ष डीएमकेसह सर्व अन्य पक्षांनी पंतप्रधानांनी या बैठकीत भाग घेऊ नये, अशी मागणी केली आहे. पुढील आठवड्यात 10 ते 17 नोव्हेंबरदरम्यान राष्ट्रमंडळ देशांची बैठक श्रीलंकेची राजधानी कोलंबोत होणार आहे.

भारताचा सहभाग असावा
मेलबर्न । श्रीलंकेत होणा-या राष्ट्रमंडळ देशांच्या परिषदेत भारताची सर्वोच्च स्तरीय सक्रिय भागीदारी असायला हवी, अशी मागणी काही राष्ट्रमंडळ देशांच्या मंत्र्यांनी परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद यांच्याकडे केली आहे. आयओआरएआरसी (इंडियन ओशन रिम असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन)च्या बैठकीत ही मागणी करण्यात आली.