आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संसदेवर म्हणाले मोदी- गरीबांचे अधिकार अडकून पडले, मनतंत्राने नाही चालत देश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेचे कामकाज रोखून धरण्यावर टीका केली आहे. गुरुवारी मोदी म्हणाले, 'यावेळी संसदेचे कामकाज ठप्प असल्याने गरीबांच्या हक्कावर गदा येत आहे. आज देशासमोर दोन संकटे आहेत. एक मनतंत्र आणि दुसरे मनीतंत्र. मनतंत्राने देश चालत नाही आणि मनीतंत्रापासून देशाला वाचवायचे आहे.'

पंतप्रधान म्हणाले, 'मनतंत्राने देश आणि लोकशाही चालत नाही. व्यवस्थेसोबत लोकशाहीला जोडावे लागते. सर्वांना सोबत घेऊन चालावे लागते.'

आणखी काय म्हणाले मोदी
- 'आधी निवडणुकीचा अर्थ लोकशाहीचे कंत्राट देणे होते. लोकशाहीत सर्वात पहिली अनिवार्य गोष्ट म्हणजे, जागरुकता. जागरुकतेसाठी सर्व प्रकारचे प्रयत्न कायम करावे लागतात. जेवढ्या प्रमाणात जागरुकता वाढीस लागते तेवढ्या प्रमाणात प्रश्न सुटण्याचे मार्ग मोकळे होतात.'

एका कार्यक्रमात बोलताना मोदी म्हणाले, 'जनतेचा सहभाग वाढला पाहिजे.' ते म्हणाले, 'कळत-नकळत कसे झाले माहित नाही, आपल्या देशात लोकशाहीचा अर्थ संकुचित झाला. लोकांना वाटू लागले की लोकशाही म्हणजे निवडणूक आणि सरकार निवडणे. लोकशाही म्हणजे सरकर निवडणे एवढाच लोकशाहीचा अर्थ झाला. लोकशाही सामर्थ्यवान तेव्हाच होणार जेव्हा लोकांची भागिदारी वाढेल.'

भारतीय स्वातंत्र्यता आंदोलन आणि महात्मा गांधींचा उल्लेख करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, 'देशाच्या स्वातंत्र्यासाठी जीवन अर्पण करण्याची तयारी असलेल्यांची देशात कधीही कमतरता नव्हती. जेव्हा पासून देश गुलामगिरीत होता तेव्हापासून एकही दशक असे नव्हते जेव्हा देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्यांची कमतरता राहिली असेल. मात्र गांधींनी जो बदल आणला त्यामुळे लोक स्वातंत्र्यांच्या जनआंदोलनात जोडले गेले. त्यांनी स्वातंत्रता आंदोलनाचे पाईक होण्याचे लोकांना आवाहन केले.'

पंतप्रधान म्हणाले, 'गांधी म्हणाले होते जर तुम्हाला स्वांतत्र्य आंदोलनाचा शिपाई व्हायचे असेल तर चरखा चालवला पाहिजे, झाडू चालवला पाहिजे, तेव्हाच स्वातंत्र्य मिळेल.'
स्वातंत्र्यानंतर देशात विकासाचे मॉडेल गांधींच्या प्रेरणेने जनतेच्या सहभागाचे असते, तर आज जे म्हटले जाते सर्वकाही सरकार करेल, ही मानसिकता राहिली नसती. आता अशी स्थिती निर्माण झाली आहे की सर्वकाही सरकार करणार, याउलट गांधींचे मॉडेल म्हणत होते की सर्वकाही जनता करणार.'