आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • PMO Rejects Smriti Irani Osd Demand News In Marathi

स्मृती इराणींना महिन्याभरात दुसरा झटका, PMO ने OSD ची नियुक्ती रोखली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांना एका महिन्यात दुसरा मोठा झटका बसला आहे. ऑफिसर ऑन स्पेशल ड्यूटी (ओएसडी) पदावर गेल्या दहा महिन्यांपासून मनुष्यबळ विकास मंत्रालयात कार्यरत असलेले संजय काचरू यांची नियुक्ती पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) रोखली आहे. मात्र, काचरू मागील तीन दिवसांपासून गैरहजर आहेत.
एका वृत्तवाहिणीनुसार, इंटेलिजेंस ब्यूरोचा (आयबी) अहवाल आल्यानंतर पीएमओने ही कार्यवाही केली आहे. संजय काचरू अजूनही आपल्या जुन्या कंपनीच्या संपर्कात असल्याचे आयबीने म्हटले आहे. आता काचरू यांच्या नियुक्तीवर अंतिम निर्णय कॉबिनेट कमेटी ऑफ अपायंटमेंटमध्ये होईल. या नियुक्तीस परवानगी मिळाली नसतानाही स्मृती इराणी यांनी काचरू यांना रुजू होण्यास सांगितले होते. काचरू हे स्मृती इराणी यांचे निकटवर्तीय आहेत.

दरम्यान, स्मृती इराणी यांना मागील महिन्यात भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. त्यामुळे एकेकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मर्जीतल्या समजल्या जाणार्‍या स्मृती इराणी यांचा पूर्वीसारखा दबदबा राहिलेला नाही, असे चित्र दिसत आहे.