आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केंद्रात सरकार बदलले; पण पीएमओचे उत्तर तेच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - केंद्रात सरकार बदलले आहे. परंतु आरटीआय अर्जावर पंतप्रधान कार्यालयाचे उत्तर मात्र तेच असल्याचे एका प्रकरणात स्पष्ट झाले आहे. निवृत्त कमांडर लोकेश बत्रा यांच्याशी संबंधित प्रकरणात पीएमओने मनमोहनसिंग यांच्या काळात उत्तर दिले नव्हते. मोदी सरकारमध्येही उत्तर देण्यास कार्यालयाने नकार दिला.
बत्रा यांनी गेल्या वर्षी पंतप्रधान कार्यालयास आरटीआयअंतर्गत अर्ज केला होता. त्यात माहिती हक्क कायद्याच्या अंमलबजावणीशी संबंधित फायलींचा तपशील देण्याची मागणी केली होती. सिंग यांच्या कार्यकाळात पीएमओने ही माहिती देण्यास नकार दिला होता. माहितीचा वापर कसा केला जाणार आहे, हे स्पष्ट होत नसल्याने माहिती दिली जाऊ शकत नसल्याचे म्हटले होते.