आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • PMO Sent Letter To Kejriwal Instead Of Anna Causes Split

\'काँग्रेसच्या गोटात गेले होते अण्णा, पीएमओच्या पत्राने केजरीवालांसमोर झाली होती पोलखोल\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाने देशभर प्रसिद्धी मिळविलेले सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे आणि यूपीए 2 मधील तत्कालिन परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद यांच्यातील गुप्त बैठकीनंतर, पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) पाठवलेले पत्र चुकीने केजरीवाल यांच्या हातात पडले आणि अण्णा व केजीरवाल यांच्यात दरी निर्माण झाली. असा दावा एका इंग्रजी दैनिकाने केला आहे. दैनिकातील वृत्तानुसार, पीएमओला लक्षात आले नाही, की हे गुप्त पत्र थेट अण्णांच्या गावी - राळेगणसिद्धीला पाठवले पाहिजे.
या घटनेशी संबंधीत सूत्रांच्या हवाल्याने वृत्तपत्राने म्हटले आहे, की पीएमओचे पत्र हातात पडल्यानंतर केजरीवाल यांना संशय आला. पत्र वाचल्यानंतर त्यांना अण्णा आणि काँग्रेसमध्ये झालेला गुप्त करार लक्षात आला. पत्रात अण्णा आणि खुर्शीद यांच्या पुण्यातील भेटीचा उल्लेख होता. त्याचबरोबर 2014 च्या निवडणुकीत काँग्रेसचा प्रचार करण्याची इच्छा व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद देण्यात आले होते. यानंतर नाराज केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेऊन खुर्शीद यांच्या सिक्रेट मिशन आणि पंतप्रधान मनमोहनसिंग माझ्यात आणि अण्णांमध्ये दरी निर्माण करत असल्याचा आरोप केला. खुर्शीद यांची गुप्त मिशन उघड होणे हा त्यांच्यासाठी मोठा झटका होता. कारण त्यांनी अण्णांसोबत भेट झाल्याचे वारंवार नाकारले होते. हजारेंनाही ही भेट जगजाहीर होऊ द्यायची नव्हती.
सर्वांच्या लपून झाली होती भेट
सूत्रांच्या माहितीनुसार, पुण्याच्या जवळ ही गुप्त भेट झाली होती. तेव्हा किरण बेदीही पुण्यात होत्या. अण्णांनी त्यांना मी एका संत व्यक्तीची भेट घेऊन येतो असे सांगितले होते. भेटीवेळी त्यांनी त्यांच्या सुरक्षारक्षकांनाही दूर अंतरावर सोडले होते. खुर्शीद यांनी देखील त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात पोलिसांना एक खासगी भेट आहे, पत्नीच्या काकांचा मृत्यू झाला आहे त्यामुळे मी एकटाच जातो असे सांगितलेले होते. त्यानंतर अण्णा आणि खुर्शीद यांची भेट झाली होती. या भेटीत खुर्शीद यांनी सरकारची बाजू अण्णांसमोर मांडली होती.
खुर्शीद यांनी केजरीवाल यांच्या राजकीय महत्वाकांक्षा अण्णांना सांगितल्या, आणि अण्णांनी काँग्रेसचा प्रचार करावा यासाठी पंतप्रधान त्यांना पत्र पाठवतील अशी योजना तयार केली. पण पु्न्हा त्यात बदल करुन पंतप्रधान मनमोहन सिंग यांना यात आणू नये असे त्यांना वाटले आणि पीएमओ मार्फत अण्णांना पत्र पाठवण्यात आले. यासाठी पंतप्रधान कार्यालयाचे मंत्री नारायणस्वामी यांनी पत्र तयार केले आणि कार्यालयातील कर्मचार्‍यांना ते पोस्ट करण्यास सांगितले. मात्र हे पत्र केजरीवाल यांच्या कार्यालयात गेले आणि सर्व प्रकार उघड झाला. त्यानंतर खुर्शीद यांनी भेट झाल्याचे नाकारले पण अण्णांनी मान्य केले. यामुळे केजरीवाल आणि अण्णा यांच्यात वितुष्ट आले.
खुर्शीद लिहिणार पुस्तक
सलमान खुर्शीद यूपीए 2 सरकारवर पुस्तक लिहित आहेत. या पुस्तकाचे नाव 'द अदर साइड ऑफ माऊंटन' आहे. या घटनेचा पुस्तकात उल्लेख असेल की नाही हे स्पष्ट नाही मात्र, केजरीवाल आणि त्यांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाचा उल्लेख त्यात नक्की असणार आहे. यूपीए 2 खोट्या प्रचारामुळे बदनाम झाली, हे सांगण्याचा या पुस्तकाचा उद्देश राहाणार आहे. त्यासोबतच टुजी आणि कोळसा खाण वाटपासी संबंधीत घोटाळे हे घोटाळेच नव्हेत हे सांगण्याचा प्रयत्न केला जाण्याची शक्यता आहे.

पुढील स्लाइडमध्ये फोटोच्या माध्यमातून पाहा, अण्णांपासून विभक्त झाल्यानंतरचा केजरीवालांचा प्रवास