आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Poets And Academicians Believe Urdu Can Bring India, Pakistan Closer

चिनी कवीची उर्दू शायरी, पाच दशकांपासून लेखन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - ‘टूट जाता है कलम, हार्फ मगर रहता है, पांव चलतें है मगर नक्ष ठहर जाता है..’ ही शायरी एखाद्या प्रथितयश भारतीय शायराने नव्हे तर एका चिनी उर्दू प्रेमी कवीची आहे, असे म्हटले तर आश्चर्य वाटले, परंतु चिनी कवीने ती इतक्या नजाकतीने सादर केली की राजधानीतील दर्दी रसिकांनाही त्यावर उत्स्फूर्त दाद द्यावीच लागली.

झांग शिझॉन असे चिनी कवीचे नाव आहे. वयाची पंचाहत्तरीमध्येही त्यांच्यातील उर्दूचा लळा किंचितही कमी झाल्याचे दिसून येत नाही. सध्या ते भारत भेटीवर असून दिल्लीत आयोजित १७ व्या राष्ट्रीय जश्न-ए-बहार मुशायरामध्ये ते सहभागी झाले आहेत. केवळ रसिक म्हणून नव्हे तर त्यांनी त्यात आपली शायरीही पेश करून सर्वांची मने जिंकली. झांग यांनी १९७९ मध्ये आपली पहिली नझ्म लिहिली. झुल्फिकार अली भुत्तो यांना फाशी देण्यात आली होती. त्यावर एका संवेदनशील मनाचा ठाव घेणारी ती रचना होती. चायना पिक्टोरियलची उर्दू आवृत्तीची जबाबदारी त्यांच्यावर होती. १९६७ ते १९९९ पर्यंत त्यांनी ती चांगल्याप्रकारे पार पाडली. पाकिस्तान, दुबई, लॉस एंजिलिसमधील मुशायरांनाही ते हजेरी लावतात. उर्दू भाषा भारताच्या इतिहासाला जोडणारी आहे. तिचे विस्मरण धोकादायक ठरू शकते.

सरकारी हुकुमावरून
१९६३ मध्ये मला चीन सरकारकडून उर्दू शिकण्याचे फर्मान मिळाले. भारतासोबत सांस्कृतिक सलोखा वाढावा यासाठी उर्दू शिकण्याचे आदेश मला मिळाले होते. त्यावेळी मी पदवीच्या तिसर्‍या वर्षात शिकत होतो. खरे तर मला पत्रकारितेत करिअर करण्याची इच्छा होती, परंतु मला नाइलाजाने भाषा शिकावी लागत होती, परंतु नंतर मी या भाषेच्या प्रेमातच पडलो, असे झांग अभिमानाने सांगतात.