आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झारखंडमध्ये विषारी दारुचे 13 बळी, मृतांमध्ये दोन पोलिस, व्हॉलिबॉल कोच

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रांची (झारखंड) - विषारी दारु प्याल्यामुळे येथे 13 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये झारखंड आर्म्ड पोलिसच्या दोन जवानांसह रांची विद्यापीठाच्या हॉलिबॉल कोचचा समावेश आहे. अनेकांची प्रकृती गंबीर आहे. हे लोक जिथे दारु प्याले होते तिथे पोलिसांनी छापा टाकला आहे. रांचीचे डीआयजी अमोल होमकर यांनी डोरंडा आणि नामकूम येथील दोन पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. प्राथमिक तपासानुसार अवैध दारुधंद्यात पोलिसांची मिलीभगत आहे. 
 
पोलिस म्हणाले - जवान दारुच्या आहारी गेला होता.. 
 - जॅपच्या जवानांनी डोरंडा भागातून दारु खरेदी केली होती. त्यांनी ती प्याल्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली. 
 - जॅपचे डीआयजी सुधीरकुमार झा म्हणाले, की मृत जवान दारुच्या आहारी गेले होते. 
 - झारखंडचे नगरविकास मंत्री सी.पी. सिंह म्हणाले दोषींवर कडक कारवाई केली जाईल. 
 
विषारी दारुमुळे यांचा मृत्यू 
- लड्डू गद्दी (डोरंडा), इस्लाम अंसारी (डोरंडा), महमूद (कडरू), अमित (सुखदेवनगर), संदीप चौधरी (सुखदेवनगर), योगेश क्षेत्री (जॅप-1 चा जवान) आणि महादेव मुर्मू (जॅप-8 चा जवान) यांचा मृतांमध्ये समावेश आहे. 
- रांचीचे पोलिस आयुक्त कुलदीप द्विवेदी म्हणाले गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बॉडी पोस्टमॉर्टमसाठी पाठवल्या आहेत. व्हिसेराही तपासला जाईल, ज्यामुळे मृत्यूचे नेमके कारण कळू शकेल. 
बातम्या आणखी आहेत...