नवी दिल्ली - परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज म्हणाल्या की, पीओके (पाकव्यात काश्मीर) भारताचा अविभाज्य भाग आहे. पाकिस्तानने यावर बेकायदेशीर कब्जा केला आहे. आम्ही तेथील रुग्णाला व्हिसा देत आहोत. तथापि, पीओकेमध्ये राहणाऱ्या 24 वर्षांच्या एका रुग्णाने सुषमा स्वराज यांना मेडिकल व्हिसा देण्याविषयी मदतीचे आवाहन केले होते. त्याच्या लिव्हरमध्ये ट्यूमर असून दिल्लीत त्याला उपचार घ्यायचे आहेत.
कुलभूषण जाधव यांच्या आईचा व्हिसा पाकने फेटाळला होता...
- भारताने नियम लागू केला आहे की, पाकिस्तानच्या एखाद्या रुग्णाला भारताचा मेडिकल व्हिसा पाहिजे असल्यास त्यांना नवाझ यांचे परराष्ट्र सल्लागार सरताज अजीज यांच्या मंजुरीचे पत्र द्यावे लागेल.
- यावर सुषमा यांनी ट्विट केले आहे की, हा नियम पीओकेमधील लोकांना लागू नाही, कारण पीओके भारताचाच अविभाज्य भाग आहे.
- तथापि, पीओकेमध्ये राहणारा 24 वर्षीय ओसामा अलीच्या लिव्हरमध्ये ट्युमर आहे. दिल्लीतील खासगी रुग्णालयातील डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, त्याचे लिव्हर ट्रान्सप्लांट करावे लागेल.
सुषमांनी केले होते हे ट्विट...
- सुषमा यांनी गत सोमवारी ट्विट केले होते की, "अवंतिका जाधव (कुलभूषण यांची आई) आपल्या मुलाला भेटू इच्छिते. ज्यांना पाकिस्तानने मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे. मी सरताज अजीज (पाकचे परराष्ट्र सल्लागार) यांना वैयक्तिकरीत्या पत्र लिहून कुलभूषण यांच्या आईला व्हिसा देण्याबाबत म्हटले होते. त्यांना पत्राकडे लक्ष देण्याचीही गरज नाही वाटली."
- त्यांनी ट्विट केले की, "त्या सर्व पाकिस्तानी नागरिकांबद्दल माझ्या संवेदना आहेत, ज्यांना भारतात उपचारांसाठी व्हिसा पाहिजे. मुला विश्वास आहे की, सरताज अजीजही आपल्या देशाच्या नागरिकांबद्दल विचार करत असतील."