आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Police And 7 People Clean Cheat In Rape Case At Delhi

सामूहिक बलात्कारप्रकरणी पोलिसासह ७ जण निर्दोष

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिल्लीतील न्यायालयाने बलात्काराच्या आरोपाखालील पोलिस कॉन्स्टेबलसह अन्य सहा साथीदार निर्दोष असल्याचा निर्वाळा दिला. दिल्ली पोलिसांतील कॉन्स्टेबल कपिल मोहन शर्मा यांच्या पत्नीने सात जणांवर सामूहिक बलात्काराचा आरोप केला होता.

या प्रकरणी कोर्टाने पीडितेचा जबाब विश्वासार्ह नसल्याचे म्हटले आहे. तसेच कुणाच्या तरी सांगण्यावरून तिने हे आरोप केले असतील, असे मत कोर्टाने मांडले. अतिरिक्त सत्र न्यायाधीश निवेदिता अनिल शर्मा म्हणाल्या की, ‘सामूहिक बलात्कारप्रकरणी पुरेशा पुराव्यांची आवश्यकता असते. मात्र, पीडितेच्या कहाणीत विश्वासार्ह पुरावे नाहीत. तसेच परिस्थितीही तशी दिसत नाही. ही महिला स्वत: दिल्ली पोलिसांत आहे. तिला कायदेशीर प्रक्रिया व स्वत:च्या हक्कांची जाणीव आहे.

पोलिस किंवा कोर्टात तक्रार दाखल करण्यास विलंब का केला, या प्रश्नाचे उत्तर महिलेला देता आले नाही. याविषयी तिने आपले नातेवाईक अथवा मित्र-मैत्रिणींनाही काही सांगितले नाही. त्यामुळे तिच्या तक्रारीवर संशय येत आहे.’