आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Police File Case Against Aap Mla After Complaints By Shopkeepers In Delhi

अलका लांबांना अमली पदार्थाचे व्यसन - भाजपचे आमदार ओम शर्मा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आम आदमी पार्टीच्या आमदार अलका लांबा यांना अमली पदार्थाचे व्यसन असल्याचा आरोप भाजपचे आमदार ओम शर्मा यांनी केला आहे. त्यांनी लांबा यांच्या अमली पदार्थविरोधी मोहिमेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

चांदनी चौक परिसरातील तोडफोडीत अलका लांबा आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे गुंड सहभागी होते. या प्रकरणात भाजपच्या कार्यकर्त्यांना गोवण्याचा प्रयत्न होऊ शकतो, अशी भीती शर्मा यांनी व्यक्त केली. स्थानिक लोकांनी पहाटे १ ते ४ च्या सुमारास लांबा यांना त्या परिसरात पाहिले होते. ड्रग्जविरोधी मोहीम राबवणारी व्यक्ती अशा वेळेस तिथे कशाला हजर असेल? यातून त्यांना अमली पदार्थाचे व्यसन असल्याचे दिसते. मी कोणतेही महिलाविरोधी विधान केले नाही. मात्र, तुम्ही महिलेच्या नावाखाली फुलनदेवीचा मुखवटा घालत असाल तर ते चालणार नाही. लांबा ड्रग अॅडिक्ट असल्यामुळे हिंसाचाराची घटना घडली, असा दावा शर्मा यांनी केला आहे. सत्ताधारी पक्षाचे गुंडाराज आणि जंगलराज सिद्ध करण्यासाठी आणखी पुराव्याची गरज नाही. सीसीटीव्ही फुटेजमध्ये या गोष्टी आहेत. वनामध्ये एखाद्या वन्यजीवाने तुमच्यावर हल्ला केला तर त्याच्यासमोर राज्यघटना धरणार काय? आप भाजपला आपल्या कामापासून रोखत असेल तर भाजपही हातात लाठी घेण्यास मागेपुढे पाहणार नाही, असे शर्मा यांनी सांगितले.