आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुनंदांच्या व्हिसेरा नमुन्यासाठी पोलिसांचे पथक अमेरिकेत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सुनंदा पुष्कर यांच्या गूढ मृत्यूप्रकरणी दिल्ली पोलिसांची टीम गेल्या अनेक दिवसांपासून चौकशी करत आहे. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणातील गूढ उकलण्यासाठी आता अमेरिकेत जाऊन सुनंदा यांचा व्हिसेरा नमुना आणण्याचा निर्णय घेतला आहे. सुनंदा या काँग्रेसचे नेते व केरळातील तिरुवनंतपुरमचे खासदार शशी थरूर यांच्या पत्नी होत्या. त्यांचा व्हिसेरा नमुना हा अमेरिकेतील प्रसिद्ध अशा एफबीआयच्या प्रयोगशाळेत साधारणत: वर्षभरापासून पडून आहे. ही टीम या अाठवड्याच्या अखेरपर्यंत अमेरिकेतून परतेल. दिल्ली पोलिसांनी गेल्या जानेवारीत हे प्रकरण दाखल केले होते. अमेरिकन एजन्सीजनी या व्हिसेरा नमुन्याचा अहवाल नोव्हेंबरातच दिलेला आहे. त्या अहवालाची मेडिकल बोर्डापुढे चर्चा होणार आहेच, अशी माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली आहे. बहुधा या चर्चेतून दिल्ली पोलिसांना काही अपेक्षित नसावे म्हणून अधिक वैज्ञानिक तपासासाठी बहुधा दिल्ली पोलिसांनी हा निर्णय घेतला असावा, पण असे काहीही न दर्शवता व्हिसेरा नमुने परत आणणे ही तर आमची रुटीन प्रॅक्टिस आहे,असे दिल्ली पोलिसांनी म्हटले आहे.
बातम्या आणखी आहेत...