आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Police Lazy Attitude With Terrorist Jodhpur Rajasthan

मोदींच्या सभेत स्फोट घडविणारा इंडियन मुजाहिदीनचा चीफ तहसीन जेरबंद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने इंडियन मुजाहिदीनचा म्होरक्या तहसीन ऊर्फ मोनूला (24) जेरबंद केले आहे. इंडियन मुजाहिदीनची (आयएम) संस्थापक यासीन भटकळला अटक झाल्यानंतर तहसीनला आयएमचा प्रमुख करण्यात आले होते. त्याच्यावर 10 लाख रुपयांचे बक्षीस होते. बिहारमध्ये भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या सभे दरम्यान झालेल्या स्फोटांचा तो मास्टर माइंड होता. त्याला आज (मंगळवार) बिहारजवळील नेपाळ सीमेवरुन अटक करण्यात आली आहे.
बिहारच्या समस्तीपूर येथील तहसीन इंडियन मुजाहिदीनचा संस्थापक यासिन भटकळचा अतिशय जवळचा मानला जातो. हैदराबाद आणि बोधगया येथे झाल्या स्फोटांचे षडयंत्रही त्यानेच रचल्याचा आरोप आहे. अनेक दिवासांपासून पोलिसांना तो हवा होता. दिल्ली पोलिसांनी राजस्थानमधून पकडलेल्या दहशतवाद्यांच्या चौकशीत त्याची माहिती प्रथम उघड झाली.
अजमेर येथे पोलिसांच्या जाळ्यात अडकलेला वकास याच्या चौकशीत यासिनच्या अटकेनंतर तहसीन आयएमचा चीफ झाल्याची माहिती मिळाली होती. तहसीनचे भटकळ बंधूंशी अनेक वर्षांपासून संबंध होते, त्यांच्यानंतर त्यानेच ही संघटना ताब्यात घेतली होती. भारतात घातपाती कृत्य घडविण्यत तो सक्रिय होता. वकासकडून मिळालेल्या या माहितीच्या आधारे पोलिसांनी तहसीनला पकडण्यासाठी टीम तयार केल्या. पोलिसांच्या या प्रयत्नांना यश मिळाले आहे.
छायाचित्र - तहसीन अख्तर
पुढाल स्लाइडमध्ये, टुरिस्ट गाइड बनून होते राजस्थानात