आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलाला शोधणाऱ्या आईसोबत पोलिसांनी केले असे वर्तन, नजीबच्या आईला नेले अक्षरश: फरफटत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- जेएनयूचा विद्यार्थी नजीब बेपत्ता होऊन जवळपास एक वर्ष झाले आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे. परंतु अद्याप ठोस म्हणावे असे काहीही सीबीआयच्या हाती लागलेले नाही. दिल्ली हायकोर्टाने याबाबत केलेल्या टिप्पणीवरुन हे लक्षात येते. नजीबची आई आपल्या मुलाच्या शोधासाठी जागोजागी जात आहे. 

आज कोर्टासमोर जे दृश्य दिसले त्यामुळे नजीबच्या शोधाच्या आशाही आता मावळू लागल्या आहेत. मागील काही दिवसांपूर्वी त्याचे मित्र सीबीआयच्या मुख्यालयासमोर धरणे आंदोलन करत होते. नजीबच्या आईची एकच मागणी होती की सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी याप्रकरणात तपास किती पुढे गेला आहे याची माहिती द्यावी. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी तसे केलेही. 
 
सोमवारी नजीब प्रकरणात दिल्ली हायकोर्टात सुनावणी सुरु होती. त्यावेळी कोर्टाने सीबीआयच्या तपास करण्याच्या वेगाबद्दल त्यांना फटकारले. सुनावणीनंतर कोर्टाच्या बाहेर माध्यमांशी बोलत असणाऱ्या त्याच्या आईला पोलिस फरफटत घेऊन गेले. नजीबच्या मित्रांनाही एका पोलिस ठाण्यात नेण्यात आले. नंतर त्या सर्वांना सोडून देण्यात आले. पोलिस उपायुक्त बी. के, सिंह यांनी याबाबत सांगितले की, हे लोक जबरदस्ती कोर्टात येण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. कोणत्याही प्रकारच्या मारहाणीचा आरोप त्यांनी फेटाळून लावला. 
 
पुढील स्लाईडवर आणखी फोटो
 
बातम्या आणखी आहेत...