आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलांसोबतचे वर्तन पाहूनच पोलिसांना पदोन्नती मिळणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- दिल्लीत पोलिसाने महिलेशी केलेल्या गैरवर्तनाच्या पार्श्वभूमीवर अशांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश केंद्रीय गृह मंत्रालयाने राज्यांना दिले आहेत. एवढेच नाही, तर पदोन्नती देताना महिलांना देण्यात येणारी वागणूक, त्यांच्याप्रती दृष्टिकोनही बघितला जाणार आहे.
सर्व राज्यांना दिलेल्या मार्गदर्शक सूचनेत मंत्रालयाने म्हटले की, दखलपात्र गुन्ह्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी एफआयआर नोंदवणे बंधनकारक आहे. एखाद्या पोलिसाने महिलेशी गैरवर्तन केले, असभ्यपणा दाखवला किंवा पक्षपाती वागणूक दिली असल्यास त्याचे पोस्टिंग, पदोन्नती करताना या बाबी विचारात घ्याव्यात. इतकेच नव्हे तर त्यांच्यावर कठोर कारवाईही करावी. वर्तवणूक कळावी म्हणून पोलिसाच्या कामगिरीचा वार्षिक मूल्यमापन अहवालात "जेंडर सेन्सिटिव्हिटी'चा उल्लेख करावा. गृह मंत्रालयाचे सहसचिव कुमार आलोक यांनी या सूचना दिल्या आहेत.

महिला छळाची ९% प्रकरणे खोटी : महिलांच्या छळाशी संबंधित २०१३ मध्ये दाखल प्रकरणांतील ९ टक्के प्रकरणे खोटी होती, अशी माहिती केंद्रीय गृह राज्यमंत्री हरीभाई पार्थीभाई पटेल यांनी बुधवारी राज्यसभेत दिली. असे असले तरी भादंवि कलम ४९८ (अ )चा देशात सर्वात जास्त दुरुपयोग होतो, असे सुचवणारा थेट पुरावा अथवा अभ्यास उपलब्ध नाही, असेही पटेल यांनी स्पष्ट केले.
बातम्या आणखी आहेत...