नवी दिल्ली- 'इंदू सरकार' या चित्रपटाचा वाद वाढत चालल्याने निर्माते मधुर भांडारकर यांना पोलिस संरक्षण पुरविण्यात आले आहे. त्यांना दिवसा आणि रात्री दोन पोलिस संरक्षण देणार आहेत.
भांडारकर यांचा इंदु सरकार हा चित्रपट आणीबाणीच्या कालखंडावर आधारित आहे. त्याला काँग्रेसचे कार्यकर्ते विरोध करत आहेत. त्यांच्या विरोधामुले भांडारकर यांना पुणे आणि नागपूर येथील पत्रकार परिषदही रद्द करावी लागली. 'इंदू सरकार' हा चित्रपट काल्पनिक प्रसंगावर आधारित असल्याचे भांडारकर यांचे म्हणणे आहे. तर काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी चित्रपटाचे स्पेशल स्क्रीनिंग आयोजित करावे अशी मागणी केली आहे.