आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'सेक्‍स अँड स्‍मोक\' पार्टीवर पोलिसांची धाड, अल्‍पवयीन मुलीही होत्‍या मद्यधुंद

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुरगाव- देशाची राजधानी नवी दिल्‍ली आणि जवळच्‍या एनसीआर परिसरातील तरुणाई व्‍यसनांच्‍या विळख्‍यात अडकत आहे. रविवारी रात्री पोलिसांनी गुरगावच्‍या एका पबमध्‍ये छापा मारुन अनेक अल्‍पवयीन मुलामुलींना मद्यधुंद अवस्‍थेत ताब्‍यात घेतले. या पबमध्‍ये 150 पेक्षा जास्‍त मुले-मुली बेधुंद होत मद्यपान करीत होते. एका मुलाने वाढदिवसाच्‍या निमित्ताने 'सेक्‍स अँड स्‍मोक' पार्टी आयोजित केली होती. पोलिसांनी छापा मारला त्‍यावेळी अनेक मुलेमुली आक्षेपार्ह स्थितीत आढळून आले.

उत्‍पादन शुल्‍क विभाग आणि पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. ताब्‍यात घेण्‍यात आलेल्‍या बहुतांश मुलीचे वय 15 ते 20 वर्षांपर्यंत असून त्‍यापैकी अल्‍पवयीन मुलींना समज देऊन सोडून देण्‍यात आले. त्‍यांच्‍या कुटुंबियांनाही बोलाविण्‍यात आले होते. उत्‍पादन शुल्‍क विभागाने शहरातील सर्व पब आणि डिस्‍कोमध्‍ये कडक सुचना दिल्‍या असून 25 वर्षांखालील तरुण-तरुणींना मद्य देऊ नये, असे निर्देश दिले आहेत.