आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राम रहीम तुरुंगात जाताच हनीप्रीतचे पलायन; आश्रमात सुरु असलेले काम पाहुन पोलिसही चक्रावले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिलासपूर- गुरमीत राम रहीम हा आश्रमातील दोन साध्वीवर केलेल्या कथित बलात्कारप्रकरणी 20 वर्षांसाठी तुरुंगात खडी फोडण्यासाठी गेला आहे. राम रहीमची दत्तक कन्या हनीप्रीत तेव्हापासून गायब झाली आहे. तिने नेपाळमध्ये पलायन केल्याचा पोलिसांना संशय आहे. पो‍लिस हनीप्रीतचा शोध घेत आहेत. बिहारसह नेपाळच्या सीमेवर पोलिसांनी सर्च ऑपरेशन सुरु केले आहे.

कोनी पोलिसांनी दुसर्‍या दिवशी गतौरी येथील डेरा सच्चा सौदा आश्रमावर छापा टाकला. पोलिसांनी बंद गुहेचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. गुहेत सर्वत्र अंधार होता. आतल्या खोलीत जाण्यासाठी एक लांब सीडी सापडली.

'हे' पाहून पोलिसही चक्रावले..
- सच्चा डेरा सौदा आश्रमात पोलिस पथक पोहोचले तेव्हा तिथे भजन-कीर्तन सुरु होते. आश्रमात स्थानिक महिला, पुरुष आणि मुलेही उपस्थित होते.
- मुले माइकवर राम रहीमच्या नावाचे भजन गात होते. हे पाहून पोलिसही चक्रावले.
- आश्रमात राहाणार्‍या साध्वींनी सांगितले की, आश्रमात भजन-कीर्तन नित्याचे आहे.  
- पोलिसांना आश्रमात हनीप्रीतशी संबंधित कोणताही ठोस पुरावा मिळाला नाही.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... गतौरी येथील डेरा सच्चा सौदा आश्रमात पोलिसांनी केलेल्या कारवाईचे फोटो...
बातम्या आणखी आहेत...