गुडगाव/मानेसर- मानेसर येथील एका आई आणि मुलीच्या हत्याप्रकरणातील गुढ पोलिसांनी उकलले आहे. हत्येच्या आरोपात महिलेचा मुलगा आणि त्याच्या दोन सहका-यांना पोलिसांनी अटक केली आहे. हत्येमध्ये वापरलेले हत्यार आणि एक कार पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. का केली हत्या..
- पोलिसांनी सांगितले की, भीम नावाच्या एका मुलाने त्याची आई आणि बहिणीची हत्या केली.
- त्या मुलाला त्याची आई आणि बहीणीच्या चारित्र्यावर संशय होता.
- डीसीपी सुमितकुमार यांनी सांगितले की, 19 सप्टेंबरला सकाळी मानेसरच्या एका रिकाम्या प्लॉटमधून दोन मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत.
- त्यांनी सांगितले की, मृतदेहांची ओळख पटली असून ते नवी दिल्लीच्या नजफगड येथील प्रेम नगरातील राहणारे आहेत.
- 40 वर्षीय सुनिता आणि 15 वर्षीय मुलगी रितीकाची हत्या झाली आहे.
- पोलिसांनी सांगितले की, 21 वर्षीय भीमने आई सुनिता आणि बहिण रितीकाची हत्या केली.
- त्याची आई आणि बहीण देह व्यापार करत असल्याचा मुलाला संशय होता.
- या हत्याप्रकरणात भीमचे मित्र धर्मवीर आणि प्रदीप यांचाही सहभाग होता.
- पोलिसांनी तिघांनाही अटक केली आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करुन पाहा, हत्या प्रकरणातील फोटो..