आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गावकऱ्यांनी बिबट्याला काठ्यांनी मारून ठार केले, पोलिसांची बघ्याची भूमिका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - गुडगावच्या सोहना शहराजवळ मंडावर नामक छोटे गाव आहे. मंडावरच्या ग्रामस्थांनी बिबट्याला लाठ्या-काठ्यांनी मारून ठार केले. पोलिस आणि वन विभागाचे अधिकारी स्तब्धपणे सर्व पाहत राहिले. गुरुवारी ही घटना घडली. सकाळी बिबट्याने एका तरुणावर हल्ला करून त्याला जखमी केले. त्यानंतर ग्रामस्थांनी त्याला घेरले व काठ्यांनी मारले. याप्रसंगी पोलिस व वन विभागाचे अधिकारी तेथे होते. त्यांनी पकडण्याचा प्रयत्न केला तेव्हा बिबट्या जाळे फाडून गावांतून फार्म हाऊसमध्ये दडून बसला. नंतर ग्रामस्थांनी त्याला ठार केले. यापूर्वी फरिदाबाद येथे १२ जानेवारी २०११ रोजी खेडी गुजरान नामक गावात लोकांनी बिबट्याला ठार केले होते. हरियाणाचे वनमंत्री राव नरवीर यांनी म्हटले होते की मला गावात बिबट्या शिरल्याची बातमी कळवली आहे. ठार केल्याची नव्हे.
‘जंगलात घुसखोरीमुळे वन्यप्राणी गावात’
सेव्ह अरवली मोहिमेचे प्रमुख जितेंद्र भडाना यांनी म्हटले - मंडावरच्या आसपास नेत्यांनी फार्महाऊस बांधून वन पर्यावरण उद्ध्वस्त केले आहे. पाण्याच्या शोधात बिबटे गावात येतात. अशा वन्यजीवांना ठार करणे दुर्दैवी आहे. पीपल फॉर अॅनिमलचे नरेश कादयान म्हणाले की, वन्यजीवांना माणसापासून धोका आहे.
बातम्या आणखी आहेत...