आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Police Stops Protesters On Their Way For Tral March Clash Between Police Protest

मसरत आलमवर देशद्रोहाचा गुन्हा; पोलिसांच्या गोळीबारात एकाचा मृत्यू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर- जम्मू-काश्मीरमध्ये फुटीरवादी नेता मसरत आलमच्या अटकेविरुद्ध हुरियत कॉन्फ्रन्सने शनिवारी बंद पुकारला आहे. बंदच्या काळात नारबलमध्ये पोलिस आणि निदर्शकांत झालेल्या दगडफेकीनंतर पोलिसांना गोळीबार करावा लागला. त्यात एकाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, पुलवामा जिल्ह्यात त्रालमध्ये गुरुवारी झालेल्या चकमकीत दोन युवकांचा मृत्यू झाला होता.
मसरत आलम याच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे. एका रॅलीत त्याने पाकिस्तानचा ध्वज फडकावत 'पाकिस्तान झिंदाबाद'ची घोषणाबाजी केली होती. मसरतला सात दिवसांच‍ी पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ता श्रीकांत शर्मा म्हणाले की, केंद्र सरकार जम्मू-काश्मीरमधील पंडितांसाठी स्वतंत्र वसाहती उभारण्याचे काम करत आहे. फुटीरतावादी नेत्याचा त्याला विरोध असून ते काश्मीर खोर्‍यात तणाव पसवण्याचे काम करत आहे. परंतु आम्ही फुटीरतावाद्यांचा हा डाव हाणून पाडू.
केंद्र सरकारने काश्मीरमधील विस्थापित पंडितांसाठी स्वतंत्र टाऊनशिप बनवण्याची योजना आखली आहे. परंतु त्याला मुफ्ती सरकारसह फुटीरतावादी नेत्यांनी विरोध केला आहे. दक्षिण काश्मीर त्राल येथील रॅली पोलिसांनी उधळून लावल्याने हुरियत कॉन्फ्रन्सने बंद पुकारला आहे. त्रालमध्ये शुक्रवारी पोलिस आणि निदर्शकांमध्ये झालेल्या धुमश्चष्कीत 21 पोलिस जखमी झाले आहेत.

जम्मू-काश्मीरमधील मुफ्ती सरकारवर केंद्राने दबाव टाकल्यानंतर पोलिसांनी आलमच्या मुसक्या आवळल्या. मात्र, त्यानंतर फुटीरवादी रस्त्यावर उतरले होते. फुटीरवाद्यांनी काढलेला मोर्चा पोलिसांनी अडवला असता निदर्शकांनी जोरदार दगडफेक सुरू केली. या घटनेत 14 जण जखमी झाले आहे. दुसरीकडे, राज्याचे उपमुख्यमंत्री व भाजपचे नेते निर्मल सिंह यांनी ही शुल्लक घटना असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, त्राल भागात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
पुलवामा जिल्ह्यात त्रालमध्ये गुरुवारी जवानांशी झालेल्या चकमकीत दोन युवकांचा मृत्यू झाला होता. याच्या निषेधार्थ हुरियत कॉन्फरन्सने 'त्राल चलो' मोर्चाचे आयोजन केले होते. यात दहशतवादी मसरत आलम आणि हुरियत नेते सहभागी होणार होते. मात्र, हुरियत नेता सय्यद अली शहा गिलानी यालाही मसरतसोबत गुरुवारी रात्रीपासून त्याच्या घरात नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. मसरत आलम याला शुक्रवारी सकाळीत पोलिसांनी अटक केली. मोर्चावरही बंदी घालण्यात आली. मसरत समर्थकांनी याच्या निषेधार्थ जोरदार दगडफेक सुरू केली. दिवसभर पोलिस व निदर्शकांत चकमक सुरू होती.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, पोलिस आणि निदर्शकांत झालेल्या धूमश्चक्रीचे फोटोज...