आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Police Watch On Social Media, Nation First Social Media Set Up At Mumbai

सोशल मीडियावर पोलिसांची नजर; देशातील पहिली सोशल मीडिया लॅब मुंबईत सुरू

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - संवेदनशील मुद्दे आणि त्यावरून उमटणा-या संतप्त लोकभावनेचा ठाव घेऊन त्याची यशस्वी हाताळणी करण्यासाठी मुंबई पोलिसांनी एक अभिनव प्रकल्प हाती घेतला आहे. सोशल मीडियावर मांडली जाणारी लोकांची मते आणि भावना जाणून घेऊन त्या दृष्टीने तयारी करण्याचा अशा प्रकारचा हा देशातील पहिलाच उपक्रम आहे.


लोकभावना समजून घेण्यासाठी देशातील पहिलीवहिली सोशल मीडिया प्रयोगशाळा मुंबईत सुरू करण्यात आली आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील संघटना आणि www.socialappsHQ.com यांच्या मदतीने हा उपक्रम साकारण्यात आला आहे. नॅसकॉमने मुंबई पोलिसांना पायाभूत सुविधा पुरवल्या तर सोशल अ‍ॅप्स एचक्यूने सोशल मीडियावर नजर ठेवणारे अ‍ॅप्लिकेशन पुरवले आहे. मुंबई पोलिसांनी देशातील पहिली सोशल मीडिया लॅब स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यात अत्याधुनिक सोशल मीडिया निगराणी साधने आहेत. त्याद्वारे सोशल मीडियावरील जनभावनेचे विश्लेषण पाहून तयारी करणे पोलिसांना शक्य होणार आहे, असे सोशल अ‍ॅप्सएचक्यू. कॉमचे सीईओ रजत गर्ग यांनी म्हटले आहे.


अशी चालते सोशल मीडिया लॅब
देशातील पहिल्या सोशल मीडिया लॅबमध्ये अत्याधुनिक साधनसामग्री आहे. या लॅबमधील www.socialappsHQ.com चे स्वयंचलित सोशल मीडिया हेरगिरी उपकरण लोकांच्या भावना भडकवणा-या सोशल मीडियावरील समाजविरोधी गटांचा शोध घेते. फेसबुक आणि ट्विटरसारख्या सोशल मीडियावर एखाद्या विशिष्ट विषयावर केल्या जाणा-या पोस्ट किंवा कॉमेंट्समार्फत लोकांच्या भावना आणि कौल यांचे विश्लेषण या लॅबमधील स्वयंचलित यंत्रणा करून पोलिसांना वेळीच खबरदार करते. त्यामुळे संभाव्य सामाजिक आंदोलन कसे हाताळायचे याचा अचूक अंदाज पोलिसांना बांधता येतो.
का भासली गरज? दिल्लीमध्ये जनलोकपाल आंदोलन आणि सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर उसळलेल्या जनक्षोभाचा पोलिसांना परिस्थिती हाताबाहेर जाईपर्यंत अंदाजच आला नाही. या प्रकरणांमध्ये व्यापक जनाधार मिळवण्यासाठी आणि लोकभावनांना हात घालण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेण्यात आला होता. दिल्लीप्रमाणेच मुंबईतही स्थानिक संस्था कर, अ‍ॅसिड हल्ल्यांसारख्या घटनांबाबत फेसबुक आणि ट्विटरसारख्या सोशल मीडियावर आक्रमकपणे चर्चा करत असल्याचे मुंबई पोलिसांच्या लक्षात आले आहे.


सोशल मीडियाला नेटिझन्स वैतागले
सोशल मीडियाच्या भडिमारामुळे वैतागलेल्या निम्म्याहून अधिक नेटक-यांनी एक तर सोशल नेटवर्किंगपासून ‘सुटी’ घेतली आहे किंवा ती घेण्याच्या निर्णयापर्यंत येऊन ठेपले आहेत, असे नव्याने करण्यात आलेल्या अध्ययनात आढळले आहे.
फेसबुक, ट्विटर, पिंटरेस्टसारख्या अन्य सोशल नेटवर्किंग साइट्सवर होणारे असंबद्ध आणि वायफळ अपडेट्स व वेळेचा अभाव हे नेटक-यांनी सुटीचा निर्णय घेण्याची मुख्य कारणे आहेत, असे संशोधनात आढळून आले आहे. सोशल नेटवर्क आणि ई-मेल अकाउंट्सची वाढती संख्या हाताळता हाताळता नेटक-यांच्या नाकी नऊ येत आहेत. परिणामी त्यांना सोशल नेटवर्किंग आता वैतागवाडी वाटू लागली असल्याचे www.mylife.comऑनलाइन केलेल्या 18 वर्षे आणि त्यापुढील वयाच्या 2000 नेटक-यांच्या सर्वेक्षणात आढळून आले आहे. नकोत्या अपडेट्समुळे महत्त्वाचा इव्हेंट चुकण्याची भीती 60 टक्के नेटक-यांना वाटू लागल्याने वैताग नको म्हणून सोशल मीडियापासून सुटी घेण्याचा मार्गच त्यांना जास्त सोयीचा वाटू लागला आहे.