आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सार्क प्रदेश पोलिआेमुक्त करण्यासाठी पुढाकार, भारताचा मदतीचा हात पुढे : जे.पी. नड्डा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पोलिआेसारख्या आजारापासून मुक्ती मिळावी यासाठी भारताने सार्क अर्थात दक्षिण आशियाई राष्ट्र संघटनेतील सदस्य देशांना मदत देण्याची ग्वाही दिली आहे. लोकसभेत आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा यांनी ही माहिती दिली.

सार्क देशांच्या आरोग्य मंत्र्यांच्या नुकत्याच झालेल्या परिषदेत भारताने ही मदत देऊ केली आहे. सदस्य राष्ट्रांनी परस्परांना आरोग्य पातळीवरील मदत वाढवली पाहिजे, असा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार टीबी, एचआयव्हीसाठी सर्व देशांत मिळून प्रयोगशाळा चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर भारताने सार्क प्रदेशाला पोलिआेमुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यासाठी तंत्रज्ञान पातळीवरील मोहिमांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासनही भारताने दिले आहे, अशी माहिती नड्डा यांनी दिली. त्या वेळी आरोग्यमंत्र्यांनी ‘दिल्ली जाहीरनामा’ स्वीकारला होता. त्यात २०३० पर्यंत प्रदेशातून एड्सचे पूर्णपणे उच्चाटन करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. टीबी आैषधी परवडण्याजोगी असली पाहिजे. यावर त्या वेळी एकमत झाले होते. आणखी प्रयत्न होण्याची गरज आहे. सर्व देश वार्षिक पातळीवर बैठक घेतील. त्यात विविध आजारांवर परस्परांशी संवाद साधला जाणार आहे.

संवाद विद्यापीठाचा प्रस्ताव नाही
संवाद विद्यापीठ स्थापन करण्याचा कोणताही प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन नसल्याची माहिती अरुण जेटली यांनी शुक्रवारी लोकसभेत दिली. प्रसारमाध्यमांच्या विशिष्ट विभागातून ही मागणी नेहमीच करण्यात येते. त्यावर सरकारही सकारात्मक आहे, परंतु विद्यापीठाचा आराखडा कसा असावा, हे ठरवण्यासाठी अद्याप तरी कोणतीही डेडलाइन ठरवण्यात आलेली नाही.

परदेशातील सुरक्षा दलाच्या १२ हजार सैनिकांना प्रशिक्षण
भारताच्या वतीने २०१२ पासून विविध देशांतील सुमारे १२ हजार ४७९ सुरक्षा जवानांना आतापर्यंत लष्करी प्रशिक्षण दिले आहेत. त्यात चीन आणि अफगाणिस्तानसह ६५ देशांचा समावेश आहे. संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी ही माहिती लोकसभेत दिली.