आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तराखंडमध्ये काँग्रेस आमदारांची बंडखोरी, CM रावत म्हणाले, दबावात येणार नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरीश रावत यांनी सरकार अल्पमतात नसल्याचा दावा केला. - Divya Marathi
उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरीश रावत यांनी सरकार अल्पमतात नसल्याचा दावा केला.
नवी दिल्ली/डेहरादून - उत्तराखंडमध्ये काँग्रेसच्या 12 आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर हरीश रावत सरकार संकटात सापडले आहे. भाजपचे 26 आणि काँग्रेसचे 9 बंडखोर आमदार दिल्लीत पोहोचले आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री हरीश रावत म्हणाले, की कोणाच्याही दबावापुढे झुकणार नाही. तर भाजप महासचिव कैलाश विजयवर्गीय शनिवारी म्हणाले, 'निवडणूक कधीही होऊ द्या, आमचा पक्ष तयार आहे.'
बंडखोरांची समजूत काढली जाईल..
- मुख्यमंत्री रावत शनिवारी माध्यमांसमोर आले. ते म्हणाले, 'चूक करणाऱ्यांना आम्ही माफ करु. त्यासोबत सभागृहात बहुमत सिद्ध करु. अद्याप कोणीही पक्षाचा किंवा मंत्रीपदाचा राजीनामा दिलेला नाही. पाच आमदार आमच्या संपर्कात आहेत. विरोधक मोठी चूक करत आहेत. बंडखोरांचे वागणे बरोबर नाही. आमचे सरकार अल्पमतात नाही.'

चार्टर्ड विमानाने दिल्लीला आले आमदार
- काँग्रेसचे 9 बंडखोर आमदार भाजपच्या 26 आमदारांसोबत उशिरा रात्री चार्टर्ड विमानाने दिल्लीला आले.
- अशी माहिती आहे, की शनिवारी ते येथे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेऊन पुढील रणनीती ठरविणार आहेत.
- या आमदारांना गुडगावमधील एका हॉटेलमध्ये थांबवलेले आहे.
- काँग्रेसचे बंडखोर आमदार भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेस सरकार अल्पमतात आले आहे.

काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री काय म्हणाले
- काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री विजय बहुगुणा म्हणाले, 'हे सरकार अनेक घोटाळ्यांमध्ये अडकलेले आहे. आणि उत्तराखंडला विनाशाकडे घेऊन जात आहे.'
- काँग्रेसचे बंडखोर मंत्री हरकसिंह रावत म्हणाले, 'आम्ही (काँग्रेस बंडखोर आणि भाजप आमदार) राज्याला एक मजबूर सरकार देऊ.'
पुढील स्लाइडमध्ये, किती सदस्यांची आहे उत्तराखंड विधानसभा
बातम्या आणखी आहेत...