आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Political Drama: 11 Parties Come Together Against Modi

राजकीय नाट्य: काँग्रेस-भाजपला ‘थर्ड’, मोदींना रोखण्यासाठी 11 पक्ष एकत्र

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा तिसरी आघाडी आकारास येत आहे.बुधवारी दिल्लीत 11 राजकीय पक्ष एकत्र आले.यामध्ये चार डावे पक्ष,समाजवादी पार्टी,जनता दल यूनायटेड,अण्णाद्रमुक,बीजू जनता दल,आसाम गण परिषद,झारखंड विकास मोर्चा,जनता दल सेक्युलर यांचा समावेश आहे.विद्यमान लोकसभेत या पक्षांच्या एकूण 92 जागा आहेत.जातीयवाद रोखण्यासाठी एकत्र आल्याचे आघाडीत सहभागी माकप नेते सीताराम येचुरी,जेडीयूचे शरद यादव यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितले.
चाल । आघाडीमागचा हेतू
सन 1996 मध्ये लोकसभेत कुणालाही बहुमत मिळाले नव्हते.भाजपचे (161 + 26 )सरकार 13 दिवसात गडगडले होते.काँग्रेसने (140) प्रयत्नही केला नव्हता.अशावेळी जनता दल,सपा,तेलगू देसमच्या राष्ट्रीय आघाडीने (79) आणि डाव्या आघाडीने (52 ) इतर पक्षांनी एकत्र येऊन काँग्रेसच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन केले होते.यावेळीही या पक्षांना हीच आशा आहे.
आव्हान । 11 पक्ष,11 नेते
आघाडी किती काळ टिकेल याबद्दल शंका आहे.कारण आघाडीतील मुलायम,नितीश,जयललिता,प्रकाश करात,देवेगौडा सगळ्यांनाच पंतप्रधान व्हायचे आहे.त्यामुळेच अधिकृतपणे आघाडी स्थापन करण्याऐवजी एकत्र राहण्याचा निर्णय घेण्यात आला.वेगवेगळे लढणार परंतु निवडणुकीनंतर एकत्र येणार,असे ठरले.
तिसरी आघाडी, वर्षभरात बिघाडी
वर्ष आघाडी जागा
1989-90 राष्ट्रीय आघाडी 143 (व्हि.पी.सिंह पंतप्रधान,वर्षभर टिकले )
1996-97 संयुक्त आघाडी 192 (एच.डी.देवेगौडा पंतप्रधान, वर्षभर टिकले )
1997-98 संयुक्त आघाडी 178 (इंदरकुमार गुजराल पंतप्रधान, वर्षभरच टिकाव)
अन् पुन्हा चुकले
मोदींनी भाषणात पुन्हा चूक केली. ते म्हणाले, पश्चिम बंगालच्या तुलनेत गुजरात लहान राज्य आहे. मात्र क्षेत्रफळाच्या हिशेबाने गुजरात देशात सातव्या, तर पश्चिम बंगाल तब्बल 13 व्या क्रमांकावर आहे.