आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Political Drama Continue Over Telengna Issue, Today Cabinet Emergency Meeting

तेलंगणावरून धिंगाणा सुरूच, आज मंत्रिमंडळाची तातडीची बैठक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - संसदेच्या अधिवेशनात सलग दुसरा दिवस तेलंगणा निर्मितीच्या मुद्द्यावरून धिंगाणा सुरूच होता. मंत्रिगटाच्या बैठकीत आंध्र विभाजनाच्या प्रश्नाशी निगडित विविध मुद्द्यांवर चर्चा झाली.कोणत्याही परिस्थितीत केंद्र सरकार तेलंगणा विधेयक याच अधिवेशनात मांडणार, असे गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी स्पष्ट केले, परंतु सीमांध्रच्या खासदारांनी अखेरचा प्रयत्न म्हणून हैदराबाद हा केंद्रशासित प्रदेश करण्याची मागणी केली असून महसुलाची तेलंगणा व आंध्र प्रदेशात समान वाटणी करण्याची अट ठेवली आहे. उद्या मंत्रिमंडळाची तातडीची बैठक होणार आहे.
आंध्र विभाजनाविरोधात मुख्यमंत्री किरणकुमार रेड्डी यांनी बुधवारी जंतरमंतर येथे धरणे आंदोलन केले होते.तेलंगणा निर्मीतीस काँग्रेस नेत्यांचाच विरोध व सीमांध्र भागातील मंत्री,नेत्यांनी मांडलेल्या मागण्यांच्या पार्श्वभूमीवर गुरु वारी मंत्रिगटाची बैठक झाली.तासभराच्या बैठकीत सर्व मुद्यांचा उहापोह करण्यात आला.बैठकीनंतर बोलताना गृहमंत्री शिंदे म्हणाले की, संसदेच्या याच अधिवेशनात आंध्र प्रदेश विभाजन विधेयक मांडले जाईल. मात्र हे विधेयक पारित करण्यात सरकार यशस्वी होईल का या प्रश्नावर भाष्य करण्याचे त्यांनी टाळले.
* सीमांध्रच्या काँग्रेस खासदारांच्या अटी
* सीमांध्र नेत्यांच्या मागण्या
1. मर्यादित कालावधीसाठी हैदराबाद कें द्रशासित प्रदेश करा
2. पोलावरमचा सिंचन प्रकल्पात भद्राचलमचा उपविभाग येत असल्याने आंध्र प्रदेशात समाविष्ट करा
3. हैदराबादेतील महसुलाची तेलंगणा व आंध्रात समान वाटणी
4. नवीन राजधानी वसवण्यासाठी रायलसीमासह या अांध्रला विशेष पॅकेज द्या.
* कॅबिनेटची मंजुरी आवश्यक
दोन-तीन दिवसांत निर्णय घेऊन कॅबिनेटसमोर तेलंगणा मसुदा सादर करण्यात येणार आहे.कॅबिनेटमध्ये चर्चा झाल्यानंतर हा मसुदा राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी पाठवला जाईल व नंतर संसदेच्या पटलावर मांडण्यात येईल.
*विधानसभेचा अडसर नाही
आंध्र प्रदेश फेररचना विधेयक आंध्र विधानसभेने फेटाळले होते. विधिमंडळाने हे विधेयक नाकारले तरीही संसदेत मंजुरी मिळाल्यास कें द्र सरकार नव्या राज्याची निर्मिती करू शकते, असे घटनातज्ज्ञांचे मत आहे.
* गोंधळामुळे अधिवेशनाचा दुसरा दिवसही वाया
तेलंगणाच्या मुद्द्यावर आंध्रातील समर्थक आणि विरोधक खासदारांनी ‘सर्वपक्षीय एकमुखी’ गोंधळ घातल्याने अधिवेशनाच्या दुस-या दिवशीही लोकसभा व राज्यसभेत कामकाज होऊ शकले नाही. लोकसभेत तेलंगणासोबतच तामीळ मच्छीमारांचा श्रीलंके तील छळ, सन 1984 ची दंगल आणि निडो तानियाच्या हत्येच्या मुद्द्यावरून गदारोळ झाला.दोन्ही सभागृहांचे कामकाज सुरू होताच गोंधळास सुरुवात झाली. लोकसभा 12 वाजता, तर राज्यसभा दुपारी दोन वाजेनंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आली.