आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राजकारण्यांकडून कोट्यवधींचे गाजर; निवडणुकीतील आश्वासने म्हणजे 90 टक्के धूळफेक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाच राज्यांमध्ये गेल्या दोन वर्षांत झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये बहुतेक सर्वच पक्षांनी मोफत लॅपटॉपपासून ते स्वस्तात धान्य देण्यापर्यंत आश्वासने दिली. कुठे पूर्ण राज्याला वायफाय करण्याचे वचन देण्यात आले, तर कुठे भत्ते देण्याचे आश्वासन देण्यात आले; परंतु सत्तेवर येताच बहुतेक आश्वासने पूर्ण करण्यास चक्क नकार देण्यात आला किंवा समस्यांचाच पाढा वाचण्यात आला. केवळ 10 टक्के आश्वासनांवर काम सुरू करण्यात आले. म्हणजेच निवडणुकीत इतर सर्व आश्वासने, वचननामे मतदारांच्या दृष्टीने निवडणुकीतील गाजर ठरेल. यावर ‘दिव्य मराठी’ने घेतलेला आढावा.

पंजाब: पूर्ण राज्य वायफाय करू, अद्याप एक बैठकही झालेली नाही...

> अकाली दल सरकारने सरकारी शाळांमध्ये 12 वीच्या विद्यार्थ्यांना लॅपटॉप आणि इंटरनेटसाठी डेटा कार्ड देण्याचे आश्वासन दिले होते.
वास्तविकता - अद्याप काम सुरूच झाले नाही. लॅपटॉपऐवजी टॅब देणार. मद्यावर मिळणाºया अबकारी शुल्काची रक्कम खर्च केली जाणार आहे.
> मुली आणि दलित विद्यार्थ्यांना
12 वीपर्यंत मोफत शिक्षण
वास्तविकता - पूर्वीपासूनच ही योजना लागू आहे. त्यात नवीन काहीच नाही.
> पूर्ण राज्याला वायफाय करू
वास्तविकता - सरकारी पातळीवर कोणतीही हालचाल नाही. एवढेच नव्हे तर साधी चर्चाही नाही.
> 1 रुपया प्रतिकिलोने पीठ
वास्तविकता - चार रुपये किलोने पीठ आणि 20 रुपये किलो डाळ आधीपासूनच देण्यात येते. आता केंद्र सरकारकडे डोळे.
> अल्पभूधारकांही पीएफचा लाभ
वास्तविकता - हालचाल नाही.

हिमाचल प्रदेश: 12 सिलिंडरचे वचन, आता म्हणतात केंद्राला विचारू ....

> सत्तेवर आल्यास 12 गॅस सिलिंडर देण्यात येतील, असे काँग्रेसने सांगितले होते.
वास्तविकता - ही योजना लागू करता येईल का, याबाबत केंद्र सरकारकडे विचारणा करू.
> 12 वी उत्तीर्ण गरीब विद्यार्थ्यांना एक हजार रुपये बेकारी भत्ता देण्याची घोषणा करण्यात आली होती.
वास्तविकता - सरकार आता म्हणतंय भत्ता देणे शक्य नाही. त्याऐवजी कुशलता विकास भत्ता देऊ. संबंधित खात्यांसोबत योजना तयार केली जात आहे.
> गुणवत्ता यादीतील दहा हजार विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप व आठव्या इयत्तेतील टॉपर विद्यार्थ्यांना विशेष लर्निंग लॅपटॉप देण्याची घोषणा.
वास्तविकता- सरकारचा स्पष्ट नकार.
> सर्व विद्यार्थ्यांना मोफत प्रवास पास देण्याचे आश्वासन
वास्तविकता - प्रवासी पास बनवण्याचे काम सुरू. आता त्यात एवढ्या अटी-शर्ती टाकण्यात आल्या की, विद्यार्थ्यांना पास बनवणेही अवघड जात आहे.

गुजरात: आश्वासने अर्धवट, फक्त पैशांचे वितरण झाले

> पूर्ण राज्याला वायफाय करू, असे आश्वासन भाजपने दिले होते.
वास्तविकता - आजतागायत हे आश्वासन हवेतच विरले आहे.
> सर्वच नागरिकांना अपघात विमा देण्यात येईल.
वास्तविकता - आतापर्यंत या योजनेवर काहीच काम नाही.
> 50 लाख स्वस्त घरकुले बनवू. यापैकी 28 लाख घरकुले शहरात, तर 22 लाख गावांमध्ये बनवण्याचे आश्वासन.
वास्तविकता - सरकारने मुख्यमंत्री घरकुल समृद्धी योजनेसाठी 4400 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
> 16 लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आणणार
वास्तविकता - यासाठी 3195 कोटी रुपयांची तरतूद क रण्यात आली, परंतु काम अद्याप सुरू झालेले नाही.


तामिळनाडू:महिलांना सर्वात आधी प्राधान्य, विद्यार्थी-शेतकरी प्रतीक्षेतच
> 11 वी, 12 वीच्या विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप देण्याचे आश्वासन जयललितांनी दिले होते.
वास्तविकता - योजना बस्त्यात. लागूच झालेली नाही.
> पूर्ण राज्यात चार वर्षांत थ्री फेज विद्युत पुरवठा
वास्तविकता - सध्या ग्रामीण भागात 12 ते 16 तास लोडशेडिंगचे संकट
> 20 किलो तांदूळ दरमहिन्याला देणार
वास्तविकता-सत्तेवर येताच तांदळाचे वाटप सुरू.
> महिलांना मिक्सर,ग्राइंडर, पंखे मोफत
वास्तविकता - तत्काळ वितरण सुरू
> विवाहावेळी तरुणींना 25 हजार रुपये रोख मदत. सोबतच चार ग्रॅमचे मंगळसूत्रही.
वास्तविकता - योजनेची अंमलबजावणी सुरू.

उत्तर प्रदेश: पूर्ण राज्य वायफाय करणार, प्रत्यक्षात एकही बैठक नाही.

> बसपची सत्ता उलथवून पूर्ण बहुमत मिळवणाºया समाजवादी पार्टीने 10 वी आणि 12 वी उत्तीर्ण सुमारे 46 लाख विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप, टॅब्लेट वाटप करण्याचे आश्वासन दिले होते.
वास्तविकता - 50 टक्के विद्यार्थ्यांनाच टॅब्लेट मिळाले.2013 मध्ये आणखी एक बॅच उत्तीर्ण झाली.
> दहावी उत्तीर्ण मुस्लिम विद्यार्थ्यांना 30 हजार रुपयांची रोख मदत
वास्तविकता - योजनेची अंमलबजावणी अत्यंत संथ गतीने.
> 35 वर्षांपेक्षा कमी वयाच्या बेकार तरुणांना एक हजार रुपये भत्ता देण्याचे आश्वासन
वास्तविकता - सुरुवातीला रोजगार कार्यालयांसमोर मोठमोठ्या रांगा लागल्या. लाठीमार झाला. आता काम थांबले आहे.

(प्रतिनिधी - चंदिगडहून इंदरप्रीत सिंह, सिमला - प्रकाश भारद्वाज, अहमदाबाद - मुनव्वर पतंगवाला, चेन्नई - एन. अशोकन, लखनऊ - विजय उपाध्याय)