आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकीय नेतेच करताहेत काळा पैसा पांढरा, एका वाहिनीने स्टिंगद्वारे केला दावा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - नवी दिल्ली आणि देशाच्या राजधानी शहरात अनेक नेते कथित स्वरुपात मोठ्या प्रमाणावर कमिशन घेऊन काळा पैसा पांढरा करून देताना दिसत आहेत. मंगळवारी एका वाहिनीने स्टिंगद्वारे असा दावा केला.

राजकीय पक्षाचे स्थानिक नेते पक्षाच्या कार्यालयात काळा पैसा पांढरा करण्यासाठी सौदा करताना दिसले. यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, बहुजन समाजवादी पक्ष, समाजवादी पक्ष आणि जनता दल (यू)चे नेत्यांचा समावेश आहे. स्टिंगमध्ये गाझियाबादचे नेते वीरेंद्र जाटव कार्यालयात बसून ३५ ते ४० टक्के कमिशन मागताना दिसत होते. एका क्लिपमध्ये जाटव यांनी म्हटले, “हे काम हातोहात होईल. तुम्हाला एका तासाच्या आत रोख रक्कम मिळेल.’ नोएडामध्ये सपा नेता टिटू यादव यांनी नोटा बदलण्यासाठी ४० टक्के कमिशन मागितले. त्यांनी कॅमेऱ्यासमोर सांगितले, “तुम्हाला जुन्या नोटांच्या बदल्यात नव्या नोटा मिळतील. ४० टक्के कमिशन लागेल.’ राष्ट्रवादीचे नेते रवीकुमार यांनी म्हटले, हे रुपये एका बनावट प्रमोशन कंपनीला दिलेले दाखवू. त्यांनी दिल्ली राष्ट्रवादीचे अध्यक्ष कंवर प्रतापसिंह यांच्याशी ओळख करून दिली. जनता दल (यू)चे उपाध्यक्ष सतीश सैनी हे सुद्धा ३० ते ४० टक्के कमिशन मागताना दिसून आले.
बातम्या आणखी आहेत...