आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Political Parties Share Different Views Over Sanjay Dutt Punishment

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संजय दत्तच्या माफीसाठी सरकार प्रयत्न करणार ?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली/मुंबई- संजय दत्तची शिक्षा माफ करण्‍याच्‍या मुद्यावरुन राजकारण पेटले आहे. सरकारने नरमाईची भूमिका घेतली आहे. तर भाजपने विरोध केला आहे. अभिनेता संजय दत्तला माफी द्यावी, यासाठी प्रेस काऊंसिलचे अध्‍यक्ष न्‍या. मार्कंडेय काटजू यांनी राज्‍यपालांना पत्र लिहीले. त्‍यानंतर राष्‍ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना आणि समाजवादी पार्टीनेही त्‍याला माफ करण्‍याची भूमिका घेतली आहे. परंतु, भारतीय जनता पार्टीने संजय दत्तला माफी देण्‍यास विरोध केला आहे. त्‍याला का माफ करावे, असा सवाल भाजपने उपस्थित केला आहे.

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री मनीष तिवारी यांनी काटजू यांच्‍या वक्तव्‍याचे समर्थन केले. काटजू यांच्‍या प्रतिक्रीयेची नोंद गांभीर्याने घेतली जाते. हा एक न्‍यायालयीन मुद्दा आहे. यावर गांभीर्याने विचार झाला पाहिजे, असे तिवारी म्‍हणाले.

राष्‍ट्रवादी कॉंग्रेचे प्रवक्ते डी. पी. त्रिपाठी यांनी संजय दत्तला माफ करण्‍याची भूमिका घेतली आहे. ते म्‍हणाले, संजय दत्तने कोणतेही दहशतवादी कृत्‍य केले नाही. त्‍याला बेकायदेशीरपणे शस्‍त्रास्‍त्रे बाळगण्‍यासाठी दोषी ठरविण्‍यात आले आहे. तो आधीच 18 महिन्‍यांची शिक्षा भोगून आला आहे. त्‍यामुळे आता त्‍याची शिक्षा माफ केली पाहिजे.

समाजवादी पार्टीचे नेते नरेश अग्रवाल यांनीही संजय दत्तची शिक्षा माफ करण्‍याची भूमिका घेतली. आम्‍ही राष्‍ट्रपती आणि राज्‍यपालांना संजय दत्तची शिक्षा माफ करण्‍याची विनंती करतो. त्‍याचे प्रकरण विशेष श्रेणीमध्‍ये ठेवून हा निर्णय घ्‍यावा. शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनीही अशीच भूमिका घेतली. त्‍याला माफी देऊन दिलासा मिळाला तर चांगलेच आहे.