आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्थसंकल्पाबाबत काय वाटते? सर्वपक्षीय राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भ्रष्टाचारविराेधातील लढा अधिक तीव्र
शेतकरी, गरीब, दलित, आदिवासी आणि वंचित घटकांसाठी अतिशय भरीव तरतुदी करतानाच भारताला उत्पादनाच्या क्षेत्रात विश्वगुरुपदी आरूढ करण्याचा संकल्प केंद्रीय अर्थसंकल्पात करण्यात अालेला अाहे. राजकीय पक्षांच्या देणग्यांच्या प्रक्रियेत पारदर्शकता आणल्यामुळे निश्चलनीकरणाच्या माध्यमातून भ्रष्टाचाराविरूद्ध छेडण्यात आलेला लढा हा अधिक तीव्र करण्याचे धाडसही या अर्थसंकल्पाने दाखविले आहे. ‘मेक इन इंडिया’पासून ‘टेक-इंडिया’पर्यंतचा प्रवास सर्व देशवासीयांच्या अपेक्षा उंचावणारा आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा संकल्प करतानाच ठिबक सिंचन, शेततळे, वीज, कृषी विमा यातील गुंतवणूक दुप्पट करण्यात आली आहे.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य

दरवर्षी अर्थसंकल्पाची गरजच काय?
‘गेल्या वर्षीची आश्वासने अद्याप अपूर्ण असताना या अर्थसंकल्पाला अर्थच काय? जनतेला दिलेली आश्वासने पूर्णच होत नाहीत, मग दरवर्षी अर्थसंकल्प सादर करण्याची गरजच काय?’ नोटबंदीमुळे जनतेला सोसावी लागलेली झळ केव्हाच भरून निघणार नाही. नोटाबंदीमुळे सरकारकडे प्राप्तिकराच्या स्वरूपात मोठी रक्कम जमा झाल्याचे सांगितले जात असले तरी बडे कर्जबुडवे राहिले बाजूलाच आणि सर्वसामान्यांच्या खिशाला हात घातला गेला. नोटबंदी करणार हे गेल्या अर्थसंकल्पात का जाहीर केले नाही?’ असा प्रश्न करीत ‘हा चुनावी जुमला तर नाही ना?’
- उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख, शिवसेना.

‘रईस’ केंद्रस्थानी, सामान्यांचा विसर
केंद्रीय अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर न करून सरकारने देशभरातील, विशेषत: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची फसवणूक केल्याची टीका काँग्रेसने केली आहे. उत्तर प्रदेशात निवडणूक असल्याने तेथे भाजपच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना कर्जमाफीचा शब्द देण्यात आला आहे, मात्र देशपातळीवर अशी कर्जमाफी करण्याचे मोदी सरकारने टाळले. हा दुटप्पीपणा अाहे. अर्थसंकल्पात ‘रईस’ केंद्रस्थानी असून त्यामध्ये सर्वसामान्यांना कुठेही प्राधान्य नाही. हे सरकार जनतेला न्याय देण्यासाठी ‘काबिल’नाही. भाजप-शिवसेनेत सध्या सुरू असलेली ‘दंगल’ आणि हा निराशाजनक अर्थसंकल्प पाहता निवडणुकीमध्ये हे सरकार ‘व्हेंटिलेटर’वरच राहील.
- राधाकृष्ण विखे पाटील, विराेधी पक्षनेते, विधानसभा तथा काँग्रेस नेते.

विषमतामुक्त भारताचे स्वप्न साकारेल
केंद्रीय अर्थसंकल्पात शेतकरी, गरीब नागरिक, महिला व युवक या चार घटकांना केंद्रस्थानी ठेवले अाहे. शेतकरी आणि गरिबांच्या कल्याणाची भूमिका या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून अधाेरेखित करण्यात अाली अाहे. शेतकऱ्यांचे क्रेडिट १० लाख काेटी करणे, दूध क्रांती, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे, मनरेगासाठी ४८ हजार काेटी,   युवकांसाठी प्रधानमंत्री काैशल्य विकास केंद्र, युवकांसाठी विविध याेजना, महिला शक्ती केंद्र, हेल्थ वेलनेस सेंटर, डिजी गाव अशा अनेक याेजना प्रस्तावित केल्या अाहेत. अायकरात सुलभता अाणण्याचाही सरकारने प्रयत्न केला अाहे. राजकीय क्षेत्रात पारदर्शकता अाणण्यासाठी आमूलाग्र बदल सुचवले आहेत. उत्पादनामध्ये देश नवव्या स्थानावरुन सहाव्या स्थानावर अाला अाहे. राजकाेशीय तूट कमी करण्यात अाली. याेग्य दिशेने सरकारचे नियोजन देशाला निश्चितपणे सर्वाेच्च स्थानी नेईल. डॉ. आंबेडकरांचे विषमतामुक्त भारताचे स्वप्न अर्थसंकल्पामुळे साकारण्यात मदत हाेईल.
- सुधीर मुनगंटीवार, अर्थमंत्री, महाराष्ट्र राज्य.

शेतकरी, छाेटे व्यापारी दुर्लक्षित
अर्थसंकल्पात कॉर्पोरेट आणि उद्योग क्षेत्राला अनेक सवलती दिल्या आहेत. शेतकऱ्यांना कर्जमाफी मात्र दिली नाही. नोटबंदीमुळे अडचणीत आलेल्या शेतकरी, छोटे  व्यापारी यांना दिलासा देण्यासाठी सरकार काही उपाययोजना करेल, अशी अपेक्षा होती. पण जेटलींनी जनतेचा अपेक्षाभंग केला आहे.   कॉर्पोरेट घराणी आणि उद्योगपतींना खुश करण्यात सरकार यशस्वी झाले आहे. पण देशातील सर्वसामान्यांची मात्र घोर निराशा केली आहेे.
- अशाेक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष तथा खासदार काँग्रेस.

महाराष्ट्राच्या पदरात काहीच नाही
या वर्षीचा अर्थसंकल्प हा केवळ आकड्याची हेराफेरी व वस्तुस्थितीशी फारकत घेणारा आहे. उद्योजकांना सवलती देताना शेतकऱ्यांना मात्र कर्जमाफी न देऊन वाऱ्यावर साेडण्यात अाले अाहे. सर्वसामान्यांचीही निराशा करणारा हा अर्थसंकल्प अाहे. नाेटाबंदीमुळे नुकसानाची झळ पाेहाेचलेला सामान्य नागरिक, लहान व्यापारी यांचीही घाेर निराशा झाली.  सर्वसामान्यांना किमान पाच लाखापर्यंतच्या उत्पन्नावर करसवलत मिळेल ही अपेक्षाही पूर्ण हाेऊ शकली नाही. महाराष्ट्रासाठी आणि मुंबईसाठी एकही स्वतंत्र घोषणा झाली नाही. 
- धनंजय मुंडे, विराेधी पक्षनेते, विधान परिषद तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते.
बातम्या आणखी आहेत...